कर्मवीर दादासाहेब गायकवाड
सबळीकरण व स्वाभिमान योजना
हिंगोली,दि.5: महाराष्ट्र
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द
घटकांत 100%
अनुदानावर (मोफत)
शेतजमीन उपलब्ध करुन देण्याकरीता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान
योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व
नवबौध्द घटकांच्या दारिद्र्य रेषेखालील
भूमीहीन कुटूंबाला (लाभार्थ्यांना) शेत जमीन उपलब्ध करुन देण्यात येत. यात 4
एकर कोरडवाहू (जिरायत) जमीन किंमत कमाल रुपये 5.00 लक्ष प्रती एकर,
2 एकर ओलीताखालील (बागायती) जमीन किंमत कमाल रुपये 8.00 लक्ष प्रती एकर याप्रमाणे उपलब्ध करुन दिली
जाते. या योजनेचा लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा, लाभार्थी
दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन असावा, लाभार्थ्यांचे वय किमान 18 वर्ष व 60 वर्ष
कमाल 60 वर्ष असावा. दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन परितक्त्या स्त्रीया, दारिद्र्य रेषेखालील
भूमिहीन विधवा स्त्री अनूसूचित जाती /जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंर्तगत
अनुसूचित जातीचे अत्याचारग्रस्त यांना प्राधान्य देण्यात येते.
या योजनेच्या अटी व शर्ती
पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनी दिनांक 10 ऑक्टोबर, 2018 पर्यंत सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण, हिंगोली या कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, असे आवाहन
सहायक आयुक्त समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment