23 October, 2018



‘कृषि उत्पन्न बाजार समिती, आखाडा बाळापूर निवडणूक 2018’
प्रारुप मतदार यादी प्रसिध्द कार्यक्रम जाहिर
        हिंगोली,दि.23 : कृषि उत्पन्न बाजार समिती आ. बाळापूर निवडणूक 2018 करिता बाजार समितीच्या गाव निहाय शेतक-यांची यादी हमाली व मापाडी मतदार संघाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याबाबत चा कार्यक्रम जाहिर झाला आहे.
          कृषि उत्पन्न बाजार समिती, आखाडा बाळापूर निवडणूक 2018 प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी कार्यक्रम पुढील प्रमाणे – (1) प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 24 ऑक्टोबर 2018 रोजी बुधवार. (2) दावे व हरकती मागविण्याचा अंतिम दिनांक 05 नोव्हेबर2018 रोजी सोमवार यासाठी आक्षेप कालावधी 10 दिवस कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून). (3) दावे व हरकती निकाली काढण्याचा अंतिम दिनांक 22 नोव्हेंबर 2018 गुरुवार रोजी, आक्षेप कालावधी 10 दिवस. (4) अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 30 नोव्हेंबर 2018 रोजी शुक्रवार. आक्षेप कालावधी हरकतीवर निर्णय घेतल्या पासून 15 दिवसाच्या आत नमुना 5 मध्ये प्रसिध्द करतील, असे जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्द पत्रकान्वये कळविले आहे.
****

No comments: