05 October, 2018

आदिवासी विकास विभागातंर्गत तीन शाळांची मान्यता रद्द विद्यार्थ्यांचे समायोजन होणार इतर शाळेत


आदिवासी विकास विभागातंर्गत तीन शाळांची मान्यता रद्द
विद्यार्थ्यांचे समायोजन होणार इतर शाळेत
हिंगोली,दि.5: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी अंतर्गत एकूण 19 नामांकित इंग्रजी शाळेत विद्यार्थी प्रवेशित असून, सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात एकूण तीन शाळांची मान्यता शासनाने रद्द केली असून तेथील प्रवेशित विद्यार्थ्यांना इतर विद्यालयांमध्ये समायोजित करण्याचत येणार आहे.
यात मान्यता रद्द करण्यात आलेली शाळा मानसिंग नाईक प्रायमरी विद्यालय, सायखेडा ता. सोनपेठ जि. परभणी या शाळेतील विद्यार्थ्यांचे हायटेक प्राथमिक व माध्यमिक विद्यालय एरडेंश्वर ता. पूर्णा जि. परभणी या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. तर शांतिनिकेतन पब्लिक स्कूल सिडको, नांदेड या मान्यता रद्द झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स पासदगाव, ता. जि. नांदेड येथे आणि भिवराई इंग्लिश मेडियम स्कूल, लातूर या मान्यता रद्द झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे गणपती इंग्लिश स्कूल भोकरदन, जि. जालना आणि ईश्वर देशमुख डे - बोर्डींग स्कूल डिग्रस, जि. यवतमाळ येथे करण्यात येणार आहे.
समायोजनाद्वारे निश्चित झालेल्या शाळेमध्ये आपल्याकडील विद्यार्थ्यांचे त्वरीत समायोजन करावे. तसेच पालकांनी उपरोक्त मान्यता रद्द झालेल्या शाळेमध्ये आपल्या पाल्यास शिक्षणाकरिता ठेवू नये. त्वरीत समायोजित शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे असे सूचित करण्यात येत आहे. मान्यता रद्द झालेल्या शाळेस सन 2018-19 मध्ये कोणत्याही प्रकारचे अनुदान अदा केले जाणार नाही. त्यामुळे मान्यता रद्द झालेल्या शाळेत आपली पाल्य असल्यास त्यांना आदिवासी विभागातर्फे कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास प्रकल्प कार्यालय जबाबदार राहणार नाही. याकरीता मान्यता रद्द  झालेल्या शाळेना व तेथील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्वरीत समायोजित करावयाच्या शाळेत आपल्या पाल्याना प्रवेशित  करावेत असे आवाहन विशाल राठोड प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, कळमनुरी यांनी केले आहे.
****

No comments: