ठक्कर
बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतंर्गत गावातील
कामांचे
प्रस्ताव 01 जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.19:
ठक्कर बाप्पा
आदिवासी वस्ती सुधार योजना सन 2018-19 अंतर्गत ज्या गावामध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत
आदिवासींची लोकसंख्या 50 टक्के पेक्षा जास्त आहे. अशा गावात विविध विकास कामे प्रस्तावित
करण्याकरिता ग्रामसभेत ठराव मंजूर करुन ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांच्या मार्फत
गावातील कामांचे प्रस्ताव दिनांक 1 जानेवारी, 2019 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
कळमनुरी जि. हिंगोली या कार्यालयास सादर करावयाचे आहेत.
इच्छूकांनी
प्रस्ताव सादर करतांना खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक असून, यामध्ये तहसीलदार
यांचे एकूण लोकसंख्येपैकी आदिवासींची लोकसंख्या प्रमाणपत्र, प्रस्तावीत काम यापुर्वी
कोणत्या ही योजनेतून झाले नसल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतचा प्रस्तावित कामाचा बहुमताने
पारीत झालेला ठराव, काम करण्यासाठी ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र, कामाचे तत्वत:
मान्यता प्राप्त अंदाजपत्रक, काम करावयाच्या जागेचे फोटो आणि कामाचा स्थळ दर्शक नकाशा
ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
तरी गावानी आपले प्रस्ताव
दि. 1 जानेवारी, 2019 पर्यंत सादर करावेत. सदर तारखेनंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा
विचार केला जाणार नाही, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****
No comments:
Post a Comment