जिल्हास्तरीय
युवा महोत्सवाचे आयोजन
·
क्रिडा विभागाकडून जिल्ह्यातील युवक-युवतीना
युवा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन
हिंगोली,दि,5:राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवक कल्याणाच्या विविध
योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता
तसेच युवांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय व
जिल्हा क्रीडा अधिकारी , हिंगोली व आत्मज विद्यामंदिर मोठ्या मारोती मंदिराजवळ,
कळमनुरी यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
दिनांक 11 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता आत्मज विद्यामंदिर , कळमनुरी येथे
करण्यात आले आहे. या युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी लोकनृत्य, लोकगीत,
एकांकिका(इंग्रजी किंवा हिंदी), शास्त्रीय गायन , शास्त्रीय वाद्य- सितार, बासरी,
वीणा, तबला, मृदंग , हार्मोनियम आणि गिटार इत्यादी कला प्रकार आवश्यक आहेत.अधिक
माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा असे आवाहन
जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment