चाचा नेहरु बाल
महोत्सव संपन्न
हिंगोली,दि.4: महिला व बाल विकास विभागातंर्गत जिल्हा महिला व बाल विकास
अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने जिल्ह्यातील कार्यरत बालगृहातील प्रवेशितांचे
दि. 30 नोव्हेंबर, 2018 रोजी चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बाल
कल्याण समितीकडून दाखल आदेश देण्यात आलेल्या संस्थांचा व सदर बालगृहातील प्रवेशित ज्या
शाळेत जातात त्या शाळेतील विद्यार्थी यांचा बाल महोत्सवात सहभाग होता. या चाचा नेहरु
बाल महोत्सवात-बळीराम नाईक शिक्षण प्रसारक मंडळ थापटी तांडा पैठण संचलित सरस्वती मुलींचे
निरिक्षण गृह, सावरकर नगर, हिंगोली, होली क्रॉस बहुउद्देशिय ग्रामिण सेवाभावी संस्था,
अहमदपूर संचलित श्री स्वामी समर्थ बालकाश्रम खानापूर (चित्ता) ता.जि. हिंगोली ,गोंविदप्रभु
शिक्षण संस्था परभणी संचलित छत्रपती शाहू बालकाश्रम, सांवगी ता. वसमत जि. हिंगोली,ज्योतिबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड संचलित बालसदन, हिंगोली
जि.हिंगोली ,आदर्श प्राथमिक विद्यालय, हिंगोली,संत नामदेव विद्यालय, हिंगोली या शाळेतील
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन
दि. 30.11.2018 रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा महिला व बाल विकास
अधिकारी, हिंगोली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात
आले होते. चाचा नेहरु बाल महोत्सवाचा समारोप
कार्यक्रमात बक्षिस वितरण करण्यात आले. समारोपाच्या कार्यक्रमास बाल कल्याण समिती अध्यक्ष
विक्रम जावळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात
सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व प्रथम/द्वितीय ची ट्रॉफी देण्यात आली. तसेच सहभागी प्रत्येक
विद्यार्थ्यास सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. बाल महोत्सव यशस्वीतेकरीता जिल्हा
कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
****
No comments:
Post a Comment