जिल्हा
वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करा
-रुचेश जयवंशी
हिंगोली,दि.6:
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियतव्यय खर्च करण्यासाठी संबंधित विभागांनी
तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावित
कामे वेळेत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा
बैठकीत जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी पी. बनसोडे, जिल्हा नियोजन अधिकारी
विनोद कुलकर्णी, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण,
एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प
कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जयवंशी म्हणाले की, आगामी कालावधीत लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लक्षात
घेवून सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत चालू आर्थिक वर्षातील मंजूर
झालेला योजनातंर्गत निधींच्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी पाठपुरावा करावा.
तसेच तांत्रिक मान्यता मिळालेल्या कामे पूर्ण करून उपलब्ध निधी वेळेत खर्च करावा.
सदर निधी समर्पित होणार नाही याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी. सर्व संबंधीत
विभागांनी दर आठवड्याला कामांचा आणि खर्चीत-अखर्चीत निधीचा अहवाल सादर करावा. तसेच
जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 अंतर्गत पुनर्विनियोजनाचे प्रस्ताव आणि जिल्हा
वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना आणि अनुसूचित जमाती उपयोजना सन
2019-20 अंतर्गत सन 2019-20 चे आराखडे शासन निर्णयातील निर्देशनुसार वेळेत नियोजन विभागाकडे सादर करावेत, असे निर्देशही
श्री.
जयवंशी यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सर्व विभागांचा योजनानिहाय आढावा घेतला.
यावेळी सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment