आज आंतरराष्ट्रीय
अल्पसंख्यांक हक्क दिनाचे आयोजन
हिंगोली,
दि.17: संयुक्त राज्य संघटनेने 18 डिसेंबर,
1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचा
जाहीरनामा स्विकृत करुन प्रस्तृत केला आहे. त्यानुसार दरवर्षी 18 डिसेंबर हा
आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणुन सर्वत्र साजरा केला जातो. त्यानुसार
अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी देखील 18 डिसेंबर हा दिवस ‘अल्पसंख्यांक
हक्क दिवस’ म्हणून पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सदर दिवसाच्या निमित्ताने
अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव/माहिती करुन
देणेबाबत सूचित केले आहे..
त्याअनुषंगाने 18 डिसेंबर, 2018 रोजी
दुपारी 12.00 वा. जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे
अल्पसंख्यांक हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्यांक
समाजातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले
आहे.
****
No comments:
Post a Comment