18
डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली,
दि.12: संयुक्त राज्य संघटनेने दिनांक 18
डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या
हक्काचा जाहीरनामा स्विकृत करुन प्रस्तृत केला आहे. त्यानुसार दरवर्षी 18 डिसेंबर
हा आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा केला जातो. त्यास अनुसरुन
अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी देखील 18 डिसेंबर हा दिवस
अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून
पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सदर दिवसाच्या निमित्ताने अल्पसंख्यांकांना
त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव/माहिती करुन देणे.
त्याअनुषंगाने दिनांक 18 डिसेंबर 2018
रोजी दुपारी 12.00 वा. जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली
येथे अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांनी
उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment