10 December, 2018

धरण क्षेत्रातील गाळपेरा जमीनीवर चारा उत्पादनासाठी अर्ज करण्याचे आवाहन




        हिंगोली, दि.10: जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील जमीनीवर चारा उत्पादन घेण्यासाठी प्रति हेक्टरी 1 रुपये भाडे तत्वावर चारा उत्पादन करावयाचा असून, एका लाभार्थ्यास 2 हेक्टर पर्यंत लाभ घेता येणार आहे.
            सदर चारा उत्पादनासाठी लागणारे बियाणे 100 टक्के अनुदानावर शासानाकडून पुरवठा केला जाणार आहे. यात मका, ज्वारी, बाजरी याचे बियाणे मोफत देण्यात येणार आहे. तरी इच्छूकांनी दि. 15 डिसेंबर, 2018 रोजी पर्यंत आपल्या जवळच्या पशु वैद्यकीय दवाखान्यात सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले आहे.

****

No comments: