जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक संपन्न
हिंगोली,दि.17:
कौशल्य व उद्योजकता विकास कार्यकारी समिती जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील
सभागृहात आज संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, प्रकल्प
संचालक श्री. घुले, आरसेटीचे संचालक श्री. दिक्षीत, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे
सहाय्यक संचालिका रेणुका तम्मलवार यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, बेरोजगारीवर
मात करण्यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रात
ज्या कामासाठी कौशल्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या कौशल्य प्राप्त कामगार निर्मितीसाठी
कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील युवक-युवतींची आवड आणि जिल्ह्यातील रोजगाराच्या संधी उपलब्धतेनुसार प्रशिक्षण
शिबीरांचे आयोजन करावे. तसेच व्यावसायीक प्रशिक्षण संस्थानी जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर
प्रशिक्षणार्थीना रोजगार उपलब्ध होतील याकरीता प्रयत्न करावे.
यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
विभागाच्या सहाय्यक संचालिका रेणुका तम्मलवार यांनी मागील इत्तिवृत्ताचे वाचन करुन
कौशल्य विकास व उद्योजकता योजनाची माहिती दिली. तसेच व्यावसायीक प्रशिक्षण संस्थेमार्फत
46 प्रशिक्षण शिबीर सुरु असून, यात 1,380 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे. तर आतापर्यंत
69 प्रशिक्षण शिबीर पूर्ण झाले असून, यात 2,027 प्रशिक्षणार्थीचा समावेश होता. यापैकी
866 प्रशिक्षणार्थीना रोजगार प्राप्त झाला असून 22 प्रशिक्षणार्थीनी स्वयंरोजगार सुरु
केल्याची माहिती दिली.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे
प्रतिनीधी, सदस्य आदी बैठकीस उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment