31 July, 2019

वयोश्री योजनेतंर्गत हिंगोली जिह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधनांसाठी नांव नोंदणी तपासणी शिबीराचे आयोजन



 वयोश्री योजनेतंर्गत हिंगोली जिह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम
अवयव सहाय्यभूत साधनांसाठी नांव नोंदणी तपासणी शिबीराचे आयोजन

        हिंगोली, दि.31: सामाजिक न्याय एवम अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, भारतीय कृत्रिम निर्माण निगम (एलिम्को) कानपूर, जिल्हा प्रशासन हिंगोली, जिल्हा अपंग पुर्नवसन केंद्र हिंगोली व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील 60 व 60 वर्षापूढील ज्येष्ठ नागरिकांना केंद्र शासनाच्या वयोश्री योजनेतंर्गत आवश्यकतेनुसार लागणाऱ्या साहाय्यभूत साधानाचे मोफत वाटप करण्यासाठी नांव नोंदणी व मोजमाप/तपासणी शिबीराचे जिल्ह्यात तालूकानिहाय आयोजन करण्यात आले आहे. 
या तपासणी शिबिरामध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना व्हिलचेअर, श्रवण यंत्र, कुबडी, सर्व प्रकारच्या काठ्या (वॉकींग स्टीक), वॉकर, रोलेटर्स, डोळ्याचे चष्‍मे, दाताची कवळी इत्यादी साहित्याचे वाटप करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात तालुकानिहाय पूर्व तपासणी  व नोंदणी शिबिराचे आयोजन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे.
            यामध्ये शुक्रवार दि. 02 ऑगस्ट, 2019 रोजी नर्सिंग महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, हिंगोली, शनिवार दि. 03 ऑगस्ट, 2019 रोजी उप जिल्हा रुग्णालय, वसमत, जि. हिंगोली, रविवार दि. 04 ऑगस्ट, 2019 रोजी ग्रामीण रुग्णालय, औंढा, जि. हिंगोली, सोमवार दि. 05 ऑगस्ट, 2019 रोजी ग्रामीण रुग्णालय, सेनगाव, जि. हिंगोली आणि मंगळवार दि. 06 ऑगस्ट, 2019 रोजी उप जिल्हा रुग्णालय, कळमनुरी, जि. हिंगोली याठिकाणी सकाळी 10.00 ते 4.00 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
वरील नमूद कालावधीत ज्येष्ठ नागरिकांनी आपले नांव नोंदणी व तपासणी करुन घ्यावे. लाभार्थ्यांनी येताना आधारकार्ड, बीपीएल पेन्शन कार्ड, अल्प उत्पन्न गटातील उत्पन्नाचा दाखला सोबत आणावा. अधिक माहितीसाठी जिल्हा अपंग पुनवर्संन केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय संबंधीत तालूक्यातील गट विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****


30 July, 2019

एच.डी.पी.ई. पाईप मिळणेकरीता पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द · पात्र लाभार्थ्यांना कागदपत्र सादर करण्याची आवाहन



एच.डी.पी.ई. पाईप मिळणेकरीता पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द
·   पात्र लाभार्थ्यांना कागदपत्र सादर करण्याची आवाहन

        हिंगोली,दि.30: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली या प्रकल्प अंतर्गत सन 2014-15 मध्ये परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एच.डी.पी.ई. पाईप मिळणेकरिता अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक प्रादेशिक  कार्यालय, यवतमाळ यांचेकडून प्राप्त झाली असून ही यादी एकात्मिक  आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली येथील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे.
            या पात्र लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे लाभ द्यावयाचा असल्याने स्व साक्षांकित  केलेली  राष्ट्रीयीकृत बँकच्या खाते क्रमाकांची प्रत, आधार क्रमांकाची द्विप्रतीत साक्षांकित केलेली प्रत, भ्रमणध्वनी क्रमांक व 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र असे सर्व दस्ताऐवज दोन प्रतीत प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी येथे दिनांक 12 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी यांनी केले आहे.
****



29 July, 2019

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना तक्रार निवारणासाठी समिती गठीत



छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजना तक्रार निवारणासाठी समिती गठीत

हिंगोली,दि.29: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेची अंमलबजावणी हिंगोली जिल्ह्यामध्ये सुरु आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा शासन निर्णय क्रमांक :संकीर्ण 0719/प्र.क्र.87/2-स दि. 12, जुलै, 2019 अन्वये तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे.
त्यानुसार तालुकास्तरीय समिती प्रत्येक आठवडयात कर्जमाफी योजनेबाबतच्या शेतक-यांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी तसेच योजनेचा लाभ मिळालेल्या शेतक-यांच्या खरीप 2019 पीक कर्ज वाटपाबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात येत आहेत,योजनेमध्ये पात्र खातेदार तसेच काही कारणास्तव  पात्रता धारण करत नसलेले खातेदार अशा दोन प्रकारच्या यादया जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, हिंगोली या कार्यालयास प्राप्त झालेल्या यादया जिल्हयातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था ता.हिंगोली/वसमत/कळमनुरी/औंढा ना./सेनगाव यांचे कार्यालयास शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, तालुकास्तरीय समितीमध्ये तक्रार घेऊन येणा-या शेतक-याचे नाव उपरोक्तप्रमाणे प्राप्त झालेल्या यादीमध्ये असल्याबाबत खात्री करावी. संबंधीत शेतक-यांना कांही तक्रार असल्यास तालुकास्तरीय समिती कडे देण्यात यावी,शेतक-याचे नाव ग्रीन लीस्टमध्ये असल्यास संबंधीत शेतक-यास योजनेचा लाभ मिळाल्याबाबत खातरजमा करावी व शेतक-याचे नाव काही कारणास्तव अपात्र होत असल्यास नेमके अपात्रतेच्या कारणाची माहिती  तालुकास्तरीय समितीने दयावी,तालुकास्तरीय समितीस अपात्रतेच्या कारणामध्ये विसंगती असल्याचे आढळल्यास अशा कर्जखात्यांची संबंधीत बँकेकडून पुनश्च तपासणी करुन शेतक-याच्या म्हणण्यामध्ये तथ्य आढळल्यास अशा कर्जखात्यामध्ये आवश्यक ती सुधारणा करुन सदर कर्जखाते  पोर्टलवर पुन्हा अपलोड करावयाची कार्यवाही करावी,संबंधीत शेतक-याचे नाव उपरोक्त प्रमाणे नमूद केलेल्या दोन्ही यादयामध्ये नसल्यास संबंधीत शेतक-योच नाव, गाव, ॲप्लीकेशन आयडी, बँक व शाखा, कर्जखाते क्रमांक इ. माहिती घ्यावी व सर्व तालुकास्तरीय समित्यांनी तक्रार निवारण दिवशी प्राप्त झालेल्या अशा सर्व तक्रारींचे एकत्रीकरण करावे व अशी यादी (संबंधीत माहितीसह) त्याच दिवशी संबंधीत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना ई मेलद्वारे सहकार आयुक्त यांनी निश्चित केलेल्या विवरणपत्रामध्ये सादर करावी. संबंधीत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी अशा सर्व तालुक्याची यादी शासनाकडे, सहकार आयुक्तांकडे व संबंधीत विभागीय सहनिबंधक यांचेकडे ईमेल द्वारे पाठविण्यात येईल,जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था यांच्याकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार महाऑनलाईन यांचेकडून अशा कर्जखात्यांबाबतची माहिती घेऊन संबंधीत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना देण्यात येईल,शेतक-याचे नाव उपरोक्तप्रामणे दोन्ही यादयामध्ये नसल्यास संबंधीत बँकेने कर्जखाते पोर्टलवर अपलोड केलेले असल्याबाबत खात्री करावी. सदर कर्जखाते संबंधीत बँकेने पोर्टलवर अपलोड केले नसल्यास अशा कर्जखात्याची तपासणी करुन त्वरीत पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात येईल,प्रत्येक तालुकास्तरीय समिती योजनेमध्ये लाभ मिळालेल्‍या पात्र शेतक-यास संबंधीत बँकेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असल्यास व शेतक-याने मागणी केली असल्यास असे पीक कर्ज संबंधीत शेतक-यास मिळाले आहे किंवा कसे, याची खातरजमा करेल,जिल्हा उपनिबंधक यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या प्रत्येक तालुक्यातील समितीने याबाबत केलेल्या कामकाजाचा अहवाल नियमितपणे सहकार आयुक्त व विभागीय सहनिबंधक यांना सादर करावा. प्रत्येक तालुकास्तरीय समितीने आपले कामकाज प्रभावीपणे पार पाडणेबाबत दक्षता घ्यावी. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी सर्व तालुकास्तरीय समितीच्या कामकाजावर देखरेख ठेवावी व त्यांना येणा-या अडचणीचे निरसन करुन सदर कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्याबाबत उपाययोजना करावी. तालुकास्तरीय समितीची सभा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था ता.हिंगोली/वसमत/कळमनुरी/औंढाना/सेनगाव यांचे कार्यालयास प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 या वेळेत आयोजीत करण्यात येणार आहे.
सदर समिती सभेवेळी संबंधीत अर्जदार व बँक शाखा प्रतिनिधी यांना बोलावून अर्जाचा निपटारा जलद गतीने करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी गठीत समितीने करावयाच्या कामकाजाबाबत जास्तीत-जास्त शेतक-यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था ता.हिंगोली /वसमत /कळमनुरी /औंढाना /सेनगाव यांचे कार्यालयात अर्ज करुन योजनेमध्ये त्यांच्या पात्र/अपात्रतेची खातरजमा करण्यात यावी ,असे आवाहन हिंगोलीचे जिल्हा उपनिबंधक सु. प्र. मेत्रेवार यांनी केले आहे.
*****



जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू



जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू

        हिंगोली,दि.29: जिल्ह्यात दिनांक 1 ऑगस्ट  रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती साजरी होणार आहे. तसेच दिनांक 5 ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरु होत असून दर श्रावण सोमवार निमित्त औंढा नागनाथ मंदिरामध्ये  तसेच जिल्ह्यात इतरही मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. तसेच दिनांक 5 ऑगस्ट रोजी नागपंचमी हा सण आहे.
            तसेच देशात झारखंड राज्यात मॉबलिचींग प्रकरणामध्ये तरबेज अन्सारी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्याभरात  आता पावेतो 1 शांतता रॅली, मोर्चा व बाजारपेठा बंद ठेवून शासनास निवेदने सादर करण्यात आले आहे. तसेच चांदणी चौक दिल्ली येथे मंदिरावर झालेल्या  हल्याच्या निषेधार्थ  जिल्ह्यात  विविध प्रकारचे निषेध आंदोलने  करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 तसेच  विविध पक्ष व  संघटनेतर्फे त्यांच्या मागणी संदर्भाने मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्तारोको, उपोषणे सुरु असून अशा विविध  घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 26 जुलै  2019 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 9 ऑगस्ट 2019 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****


25 July, 2019


जिल्हा कृती आराखड्याच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार
                                                                                                                                   -रुचेश जयवंशी
                हिंगोली,दि.25: समाजातील दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. त्यांचे समान अधिकार व संधी राखून ठेवत विविध कल्याणकारी योजना तयार करणे गरजेचे आहे. याकरीता जिल्हा कृती आराखड्याच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले.
 केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या अधिकाराबाबत केंद्र शासनाच्या वतीने ‘दिव्यांग व्यक्तीचे अधिकार अधिनियम-2016’ हा कायदा पारीत करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार सुधारीत व नविन बाबींचा अधिकाधीक लाभ समाजातील दिव्यांग व्यक्तींना मिळवून देण्याच्या हेतूने जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ‘दिव्यांग व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यासाठी आज कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप जिल्हा निवडणुक अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, शोधनाचे संचालक सुधीर घोष, सांख्यीक तज्ज्ञ सोनाली मेडीकुंट, संवाद तज्ज्ञ कृपाली बिडवे, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.    
यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, दिव्यांगासाठी अधिकारिता अधिनियम 2016 ची निर्मिती केली. दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुसह्य व्हावे याकरीता त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी कृती आराखड्याची गरज आहे. या कृती आराखड्या मध्ये, कल्पक उपक्रम व नवे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करून नवे टप्पे निर्माण करावेत. आरोग्याविषयक सुविधा, रोजगार व स्वयंरोजगार विषयक उपाययोजना, अडथळा विरहित मुक्त संचार व्यवस्था, सकारात्मक कृती व विधी विषयक उपाययोजना, प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा, वित्तीय व्यवस्था आदी बाबींचा समावेश असणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले
या वेळी शोधनाचे श्री. घोष यांनी दिव्यांगाना त्यांच्याकडे समाजाचे मुख्‍य घटक म्हणुन पाहिले पाहिजे प्रशासनाने त्यांचे अधिकार त्यांना मिळवून दिले पाहिजे.
तसेच सोनाली मेडीकुंट यांनी दिव्यांगाच्या व्याख्या आणि जिल्ह्याची योजना निहाय सांख्यीकीची माहिती दिली. विजय कान्हेकर यांनी कायद्यातील दिव्यांगाचे अधिकार आणि प्रशासनाची जबाबदारी विषयक माहिती दिली. तर कृपाली बिडवे यांनी संवाद समन्वयातून दिव्यांगाचे पुनर्वसन कसे करता येईल याचे मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यशाळेमध्ये ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार  अधिनियम 2016’  या नवीन कायद्याबाबत सवीस्तर माहिती देवून दिव्यांग व्यक्तीची जिवन सुसह्य होवून त्यांना कायद्यानुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये विविध सुविधा व उपाययोजना उपलब्ध करुन देण्यासाठी आजच्या जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्याच्या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख यांच्यासह जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, संघटनाचे प्रतिनीधी हे कार्यशाळेत सहभागी झाले होते.
****


नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन



नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज  सादर करण्याचे आवाहन

हिंगोली,दि.25: दुधाळ गाई, म्हशींचे वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करणे या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती  या प्रवर्गातील 18 वर्षावरील अर्जदारांकडून दिनांक 25 जुलै ते 8 ऑगस्ट 2019 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेची पूर्ण माहिती व अर्ज करण्याची कार्यपध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील  https://ah.mahabms.com  या संकेतस्थळावर व गुगल प्ले स्टोअर वरील AH MAHABMS  या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी.
अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत एसएमएस द्वारे संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदारने आपला भ्रमणध्वनी क्रमांक योजनेअंतर्गत अंतिम निवड होईपर्यंत बदलू नये.
अर्जदारांची प्राथमिक निवड अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार संगणकाद्वारे करण्यात येणार असली तरी अंतिम निवड ही त्याने अपलोड  केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच करण्यात येईल. योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) , पंचायत समिती अथवा  जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, हिंगोली यांनी केले  आहे.            
0000000


23 July, 2019

डेंग्युच्या लक्षाणांकडे दुर्लक्ष करणे ठरेल धोकादायक



डेंग्युच्या लक्षाणांकडे दुर्लक्ष करणे ठरेल धोकादायक

        पावसाळ्यामध्ये डोकवर काढणारा डेंग्यू हा आजार अनेकांच्या मृत्युचेही कारण ठरतो. तर पावसाळा म्हणजे अनेक किटकांसोबतच डासांच्या प्रजनांचा काळ असतो. या वातावरणामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. सध्या देशात डेंग्यूच्या आजाराने थैमान  घातले असून, अनेक रुग्णांमध्ये  डेंग्यूची लक्षण आढळून येत आहेत. अनेकांना डेंग्युमुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. पण प्रत्येकवेळी  डेंग्यू  घातक ठरत नाही. जर  सुरुवातीच्या स्टेजला या आजाराची लक्षणे  ओळखता  आली तर डेंग्युवर उपचार करणे सहज शक्य होते. पण आज आम्ही  तुम्हाला  काही अशा लक्षाणाबाबत  सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला डेंग्युच्या आजाराने  गंभीर  रुप घेतले आहे हे समजणे  शक्य होईल.
पावसाळ्यामध्य जास्तीत-जास्त किटकांच्या प्रजननांचा काळ असतो. ज्यामुळे या दिवसांमध्ये डासांची पैदास  मोठ्या प्रमाणावर होत असते. यामुळे डेंग्यूचा व्हायरस आणि त्याचा संसर्ग  होण्याची शक्यता दुपटीने वाढते. ज्यामुळे डेंग्यू पसरण्याची शक्यता आणखी वाढते.
            डेंग्यूच्या घातक स्टेजमध्ये प्लेटलेट काऊंट फार कमी होतो. ज्यामुळे रुग्णांच्या आरोग्यासोबतच त्याच्या जीवालाही धोका असतो. पण प्रत्येकवेळी डेंग्यूला घाबरण्याची गरज नाही. काही घरगुती उपायानीही डेंग्यूवर नियंत्रण मिळवू शकता.
            द हेल्थ साईटने दिलेल्या वृत्तानुसार डेंग्युची लागण झाल्याने 3 ते 7 दिवसानंतर योग्य उपचार घेतले नाही तर हा फार गंभीर  रुप धारण करु शकतो. अनेकदा या स्टेजमध्ये रुग्णांच्या शरीराचे तापमान कमी होऊ लागत, हे लक्षण पटकन  लक्षात येत नाही. अनेकदा रुग्णाचा ताप निवळून तो बरा होत असल्याचे वाटते. पण अनेकदा हा गैरसमज ठरवू शकतो. हे कदाचित डेंग्यूचे घातक लक्षण ठरु शकते.
            पोटदुखी, सतत उलट्या होणे किंवा उलटीमधून रक्त पडणे, हिरड्यामधून रक्त येणं, श्वास घेण्यास त्रास होण, लठ्ठपणा आणि थकवा ही लक्षणे या आजारात सामान्यपणे दिसून येतात. या लक्षणांपैकी एक जरी लक्षण रुग्णांमध्ये आढळून आले तर किरकोळ उपचार करीत अशा लक्षणांकडे अजिबात‍ दुर्लक्ष करु नये अस करणे रुग्णांच्या जीवावरही बेतू शकते.
            सन 2018-19 या वर्षामध्ये जिल्हा हिवताप कार्यालय, हिंगोली मार्फत जिल्ह्यामधील  एकूण 201 संशयित डेंग्यू रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी परभणी येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले होते. त्यापैकी 18 डेंग्यू  दुषित रुग्ण  जिल्ह्यामध्ये आढळून आलेले आहेत. जिल्ह्यामध्ये  ज्या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण  आढळून  आलेले आहेत.  त्या ठिकाणी  या कार्यालयाचे  साथरोग  पथकामार्फत  किटकशास्त्रीय  सर्व्हेक्षण  करुन 100 टक्के  घरांमध्ये ॲबेटींग करण्यात आली . तसेच ज्या गावांमध्ये किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे अशा एकूण 32 गावांमध्ये या कार्यालयाच्या पथकामार्फत  धुर फवारणी करण्यात आली .
            डेंग्यूच्या लक्षणांकडे  दुर्लक्ष करणे ठरेल धोकादायक त्यामुळे आजिबात वेळ व घालवता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत व सद्य:स्थितीस पारेषण काळ सुरु असल्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून  एक दिवस  पाळण्याबाबत व सभोवतालचा परिसर, नाल्या, गटारे, डबके इत्यादी साचू देऊ नयेत जेनेकरुन डासांची उत्पत्ती होणार नाही व किटकजन्य आजाराची समस्या  उद्भवणार नाही .
****



20 July, 2019

सेस व विशेष घटक योजनेतंर्गत लाभर्थ्यांकडून अर्जाची मागणी




सेस व विशेष घटक योजनेतंर्गत लाभर्थ्यांकडून अर्जाची मागणी
               
हिंगोली, दि.20:  महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद हिंगोली मार्फत जिल्हा परिषद सेस व विशेष घटक योजनेतील प्राप्त तरतुदीमधून ग्रामीण भागातील मुली व महिलांना विविध योजना राबविण्यातचे निश्चित करण्यात आलेले आहे.  सदरील योजनेचे अर्ज एकात्मिक बालविकास सेवा योजना  प्रकल्प स्तरावर  उपलब्ध  आहेत. तरी पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत.
जिल्हा परिषद सेस तरतूद :  ग्रामीण भागातील मुली व महिलांसाठी वाहन चालकाचे प्रशिक्षण देणे, ग्रामीणी भागातील महिलांसाठी तालुका स्तरावर समुपदेशन केंद्र चालविणे, ग्रामीण भागातील 7 वी ते 12 वी पास मुलींना एमएससीआयटी (संगणक) प्रशिक्षण देणे, ग्रामीण भागातील महिलांना पिको शिलाई मशीन पुरविणे, ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी पुरविणे .
                विशेष घटक योजना :  ग्रामीण भागातील मुली व महिलांसाठी वाहन चालकाचे प्रशिक्षण देणे, जिल्हा परिषद शाळेमधील इयत्ता 7 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी  स्वसंरक्षणासाठी  ज्युडो कराटे व योगाचे प्रशिक्षण देणे, ग्रामीण भागातील 7 वी ते 12 वी पास मुलींना एमएससीआयटी प्रशिक्षण देणे, महिलांना पिको शिलाई मशिन पुरविणे, पिठाची गिरणी पुरविणे, अपंग महिलांसाठी पिठाची गिरणे पुरविणे, असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण , जिल्हा परिषद, हिंगोली यांनी कळविले आहे.


लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागांर्गत घेण्यात आलेल्या गट-क संवर्ग पदाकरीता निवड झालेल्या उमेदवारांची 22 ते 29 जूलै कालावधीत कागदपत्र पडताळणी



लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागांर्गत घेण्यात आलेल्या गट-क संवर्ग
पदाकरीता निवड झालेल्या उमेदवारांची 22 ते 29 जूलै कालावधीत कागदपत्र पडताळणी

हिंगोली,दि.20: संचालनालय, लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागातील लेखा लिपिक / लेखा परीक्षा लिपिक व कनिष्ठ लेखापाल , कनिष्ठ लेखा परीक्षक या गट क संवर्गाचे रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 9 जानेवारी 2019 रोजी ऑनलाईन  जाहिरात महापरीक्षा पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली होती. सदर पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 28 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 या कालावधीत  पार पडली आहे. ऑनलाईन  परीक्षेचा निकाल दिनांक 2 जुलै 2019 रोजी महापरीक्षा  पोर्टल संकेतस्थळ  www.mahapariksha.gov.in  वर प्रसिध्द   करण्यात आला आहे. विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखापरीक्षा औरंगाबाद विभाग यांच्या स्तरावर  निकाल पत्रातील उमेदवारांच्या गुणांनुसार  सामाजिक व समांतर आरक्षणाप्रमाणे  गुणानुक्रमे तात्पुरत्या विचाराधीन उमेदवारांची यादी तयार करण्यात आलेली आहे. संचालनालयाचे https:// mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर एम्प्लॉई कॉर्नर अंतर्गत रिक्रुटमेंट रुल्सवर दिनांक 20 जुलै पासून विभागनिहाय याद्या  प्रसिध्द करण्यात येत आहेत.
                यादीमध्ये नमूद उमेदवारांना या कार्यालयाकडून कागदपत्र पडताळणी करिता वैयक्तीकरित्या संपर्क करुन (ई-मेल, स्पीड पोस्ट, व इतर सामाजिक माध्यमाद्वारे) दिनांक 22 ते 29 जुलै 2019 या कालावधीमध्ये  उपस्थिती  बाबत कळविण्यात येणार आहे.  यादीमध्ये नमूद उमेदवारांना याबाबतची सूचना या कार्यालयाकडून दिनांक 24 जुलै पर्यंत प्राप्त न झाल्यास वरील नमूद कालावधीमध्ये आवश्यक ती सर्व मुळ कागदपत्र छायांकित प्रतींसह (2 संच) सहसंचालक, लेखा व कोषागारे, लेखा कोष भवन, जिल्हाधिकारी आवार, औरंगाबाद दूरध्वनी क्रमांक 0240-2340754/2331874 आणि सहसंचालक, स्थानिक निधी लेखा, लेखा कोष भवन, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, औरंगाबाद, दुरध्वनी क्र.0240-2344016 या विभागीय कार्यालयामध्ये दिनांक 22 ते 29 जुलै या कालावधीमध्ये कागदपत्र पडताळणी करिता उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष भरती प्रक्रीया संनियंत्रण समिती तथा सहसंचालक लेखा व कोषागारे, औरंगाबाद यांनी केले आहे.
****
               


वयोश्री योजनेतंर्गत हिंगोली जिह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधनांसाठी नांव नोंदणी तपासणी शिबीराचे आयोजन - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी


वयोश्री योजनेतंर्गत हिंगोली जिह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम
अवयव सहाय्यभूत साधनांसाठी नांव नोंदणी तपासणी शिबीराचे आयोजन
-          जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
        हिंगोली, दि.20: सामाजिक न्याय एवम अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, भारतीय कृत्रिम निर्माण निगम (एलिम्को) कानपूर, जिल्हा प्रशासन हिंगोली, जिल्हा अपंग पुर्नवसन केंद्र हिंगोली व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील 60 व 60 वर्षापूढील ज्येष्ठ नागरिकांना केंद्र शासनाच्या वयोश्री योजनेतंर्गत आवश्यकतेनुसार लागणाऱ्या साहाय्यभूत साधानाचे मोफत वाटप करण्यासाठी नांव नोंदणी व मोजमाप/तपासणी शिबीराचे जिल्ह्यात तालूकानिहाय आयोजन करण्यात आले आहे.  याच्या अनुषंगाने पूर्व तयारीची आज दिनांक 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीच आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड,  अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार, उप विभागीय अधिकारी  अतुल चोरमारे, जिल्हा अपंग पुनर्वसन केद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर,  सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी , आरोग्य अधिकारी आदी या बैठकीस उपस्थित होते.
या तपासणी शिबिरामध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना व्हिलचेअर, श्रवण यंत्र, कुबडी, सर्व प्रकारच्या काठ्या (वॉकींग स्टीक), वॉकर, रोलेटर्स, डोळ्याचे चष्‍मे, दाताची कवळी इत्यादी साहित्याचे वाटप करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात तालुकानिहाय पूर्व तपासणी  व नोंदणी शिबिराचे आयोजन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे.
            यामध्ये शुक्रवार दि. 02 ऑगस्ट, 2019 रोजी नर्सिंग महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, हिंगोली, शनिवार दि. 03 ऑगस्ट, 2019 रोजी उप जिल्हा रुग्णालय, वसमत, जि. हिंगोली, रविवार दि. 04 ऑगस्ट, 2019 रोजी ग्रामीण रुग्णालय, औंढा, जि. हिंगोली, सोमवार दि. 05 ऑगस्ट, 2019 रोजी ग्रामीण रुग्णालय, सेनगाव, जि. हिंगोली आणि मंगळवार दि. 06 ऑगस्ट, 2019 रोजी उप जिल्हा रुग्णालय, कळमनुरी, जि. हिंगोली याठिकाणी सकाळी 10.00 ते 4.00 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. वरील नमूद कालावधीत ज्येष्ठ नागरिकांनी आपले नांव नोंदणी व तपासणी करुन घ्यावे. लाभार्थ्यांनी येताना आधारकार्ड, बीपीएल पेन्शन कार्ड, अल्प उत्पन्न गटातील उत्पन्नाचा दाखला सोबत आणावा. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अपंग पुनवर्संन केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय संबंधीत तालूक्यातील गट विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.
****


जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 1.81 मि.मी. पावसाची नोंद


जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 1.81 मि.मी. पावसाची नोंद

हिंगोली,दि.20: जिल्ह्यात दिनांक 20 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 1.81 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 15.40 मि.मी. पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 137.46 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर  15.40 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दिनांक 20 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिली मीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस):हिंगोली-0.29(128.94) मि.मी.,वसमत-2.43(84.72) मि.मी., कळमनुरी-1.33(167.09) मि.मी., औंढानागनाथ-5.00(182.50) मि.मी., सेनगांव-0.00(115.02) मि.मी. आज अखेर पावसाची सरासरी 137.46 नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी , हिंगोली यांनी कळविले आहे.

18 July, 2019

अल्पसंख्याक मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन


अल्पसंख्याक मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

हिंगोली,दि.18: महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली यांच्या व्यवस्थापनाखाली हिंगोली शहारालगत जिल्हा क्रीडा संकूल शेजारी सन २०१५ पासून अल्पसंख्यांक समुदायातील मुलींसाठी सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असे वसतिगृह सुरू करण्यात आलेले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० करीता सदरील वसतिगृहाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
            या वसतिगृहाची प्रवेश क्षमता १०० असून त्यापैकी जैन, शीख, पारशी, बौद्ध, मुस्लिम या अल्पसंख्यांक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी ७० जागा राखीव असून ३० जागा बिगर अल्पसंख्यांक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ज्या अल्पसंख्यांक समुदायातील कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा मुलींना वसतिगृहात मोफत प्रवेश देण्यात येतो. तसेच बिगर अल्पसंख्यांक समुदायातील मुलींना प्रती सत्र २ हजार ८५० रुपये शुल्क आकारण्यात येते.
            वसतिगृहात आंघोळीसाठी गरम पाणी, पिण्याचे शुद्ध पाणी, चौवीस तास विद्युत, अभ्यासासाठी टेबल, खुर्ची, आंतर-गृही व मैदानी खेळाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच महिन्यातून एकदा वैद्यकीय तपासणी केली जाते. तरी या वसतिगृहात उच्च शिक्षण घेणाऱ्या जास्तीत-जास्त मुलींनी प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. पाटील यांनी केले आहे .
****







16 July, 2019

जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू


जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू

        हिंगोली,दि.16: जिल्ह्यात 12 जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्या निमित्ताने तीर्थक्षेत्र नर्सी नामदेव येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात तसेच जिल्ह्यातील विठ्ठल रुख्माई मंदीरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक दर्शत घेतात.
            तसेच देशात झारखंड राज्यात मॉबलिचींग प्रकरणामध्ये तरबेज अन्सारी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ  जिल्ह्याभरात  आता पावेतो 1 शांतता रॅली, मोर्चा व बाजारपेठा बंद ठेवून शासनास निवेदने सादर करण्यात आले आहे. तसेच चांदणी चौक दिल्ली येथे मंदिरावर झालेल्या  हल्याच्या निषेधार्थ  जिल्ह्यात  विविध प्रकारचे निषेध आंदोलने  करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 तसेच  विविध संघटनेतर्फे हिंगोली जिल्ह्यात पाणीटंचाई, चाराटंचाई यामुळे मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्तारोको, उपोषणे सुरु असून अशा विविध  घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 11 जुलै  2019 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 24 जुलै 2019 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****



1 जानेवारी 2019 अर्हता दिनांकावर आधारित दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर


1 जानेवारी 2019 अर्हता दिनांकावर आधारित
दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर

        हिंगोली, दि.16: निवडणुक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुका विचारात घेऊन दिनांक  1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र  मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे.
            या कार्यक्रमाअंतर्गत  मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा पात्र मतदारांची नाव नोंदणी मतदार यादीत  करण्यासाठी आणखी संधी मिळावी व त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत याकरिता हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे- दिनांक 15 जुलै 2019- प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी, दि.15 ते 30 जुलै 2019 पर्यंत  दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी, दि.20,21,27,28 जुलै रोजी विशेष मोहिम, दि.13 ऑगस्ट 2019 रोजी दावे व हरकती निकाली काढणे, दि. 16 ऑगस्ट 2019 रोजी डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई, दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजी अंतिमक मतदार यादी प्रसिध्दी .
            या मतदार यादीमध्ये  ज्या मतदारांची नावे समाविष्ट नाहीत अशा मतदारांना नमुना -6 मध्ये अर्ज सादर करुन  त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करता येतील. तसेच अनिवासी भारतीय नागरिकांना नमुना -6 अ मध्ये अर्ज करुन मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. मतदार यादीत समाविष्ट असलेल्या नोंदीबाबत आक्षेप  असल्यास सदर नोंद  वगळण्यासाठी  नमुना -7 मध्ये अर्ज  सादर करता येतील. तसेच मतदार यादीत असलेल्या नोंदीबाबत  दुरुस्ती  करावयाची असल्यास नमुना 8 मध्ये आणि एका भागातून दुसऱ्या यादी भागात नोंद स्थलांतरीत  करावयाची असल्यास विहित नमुना -8 अ मध्ये अर्ज सादर करता येतील.
            आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक 2019 च्या अनुषंगाने प्रत्येक मतदाराने आपले नाव प्रारुप मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करुन घ्यावी, मतदार यादीत नाव समाविष्ट नसल्यास  दिनांक 15 जुलै ते 30 जुलै 2019 या कालावधीत आपले अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), संबंधित तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात जमा करावेत. तसेच मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची, यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
            अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी , हिंगोली यांनी केले आहे.
****

15 July, 2019




कर्जमाफी झालेल्या शेतकरी बांधवांना त्यांची कर्जमाफी झाल्याची माहिती द्यावी
 -- पालकमंत्री अतुल सावे

        हिंगोली, दि.15: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांची कर्ज माफी झाली का नाही याची माहिती मिळत नसल्याने ते संभ्रमात आहेत. याकरीता बँकांनी ज्या शेतकरी बांधवाची कर्जमाफी झाली आहे त्यांची माहिती बँकेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्याचे निर्देश राज्याचे उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शासकीय विभागाच्या आढावा बैठकीत श्री. सावे बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.    
            यावेळी पालकमंत्री सावे म्हणाले की, पावसाळा सुरु होऊन सुमारे दीड महिन्याहून अधिक कालावधी झाला. परंतू जिल्ह्यात अद्यापपर्यंत समाधानाकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यात 50 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे.  ज्या गावांची टँकरची मागणी आहे, अशा गावांची मागणी लक्षात घेवून त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा.
समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी हा टंचाई परिस्थितीचा मुकाबला करत आहे. सद्या पेरणीचा कालावधी असल्याने शेतकऱ्यांना वीजेची आवश्यकता असते. परंतू ट्रॉन्सफार्मर किंवा ऑईल नसल्याचे कारणे सांगुन महावितरण विभागामार्फत वीज पुरवठा केला जात नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. याकरीता शेतकऱ्यांना प्राधान्य देवून महावितरणने तात्काळ कार्यवाही करुन शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री सावे यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात 83 दिवस पुरेल इतका चारा शिल्लक असून, बी-बीयाणे आणि खते देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना आणि जलयुक्त शिवार योजने अंतर्गत उद्दिष्ट पूर्ण झाली असून उत्कृष्ट काम झाल्याने पालकमंत्री सावे यांनी शुभेच्छा हि दिल्या. जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष मंजूर झाला असून त्यासाठी लागाणारा निधी  कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती ही पालकमंत्री सावे यांनी यावेळी दिली. शासन व प्रशासन हे एकत्र येवून समन्वायाने जनतेची कामे करत असतात. जिल्हा प्रशासनाने  शेतकरी, ग्रामस्थांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना राबवाव्यात. टंचाईसदृश्य परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची जबाबदारी शासन प्रशासनाची असून, टंचाईसदृश्य गावात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: टंचाईसदृश्य भागातील पीक परिस्थिती, पाणी परिस्थिती, चाऱ्याची आवश्यकता, जनावरांची संख्या आदीची वस्तुनिष्ठ माहिती तयार करावी. जेणे करून शासनस्तरावरून शेतकरी बांधवाना योग्य ती मदत करणे शक्य होईल. येणाऱ्या कालावधीत जिल्ह्यात ज्या त्रूटी आहेत त्यासाठी निधी उपलब्ध करुन त्या त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न येणाऱ्या कालावधीत करण्यात येईल, असे पालकमंत्री सावे यावेळी म्हणाले
            प्रारंभी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी जिल्ह्याची संक्षिप्त माहिती सादर केली. तसेच यावेळी रोजगार हमी योजना, कृषी विभाग, सहकार विभाग, महावितरण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि आरोग्य या विभागाचा सविस्तर आढावा घेतला.    यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत पंडित दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रातिनीधीक स्वरुपात लाभार्थ्यांना गॅस जोडणी कार्डचे वितरण करुन शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बैठकीस जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
****



संगणकीय युगाचा विचार करुनच रोजगार प्रशिक्षणार्थींनी उद्योग उभारावेत
     -- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली दि 15: सध्याची सामाजिक परिस्थिती व संगणकीय यूगाचा विचार करुनच प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेणा-या प्रशिक्षणार्थीनी उद्योग उभारावेत अशी सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘

जागतिक  युवा कौशल्य दिन’ कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार , निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती रेणुका तम्मलवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. पी. घुले, जिल्हा उद्योग केंद्राचे जि. एस. पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जे.व्ही.मोडक, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे गणेश दराडे, कल्याण देशमुख आदीसह सर्व बँकेचे अधिकारी, प्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व व्यावसायीक प्रशिक्षण संस्था (व्ही.टी.पी.) केंद्राचे संचालक, प्रशिक्षणार्थींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. जयवंशी पुढे म्हणाले की, कौशल्य विभागामार्फत प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत तसेच स्टेट बँक इंडिया मार्फत आरसेटी (RSETI) विभागाकडूनही ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे येथे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी नावापुरतेच प्रशिक्षण न घेता,समाजाची गरज भागावणा-या उद्योगांची निमिती करावी. तसेच या युवक युवतींना प्रशिक्षण देणा-या विविध व्ही.टी.पी. संस्थांनी सद्य:स्थितीत समाजास उपयोगी व प्रशिक्षणार्थींची आर्थिक गरज पूर्ण करणारा प्रशिक्षण अभ्यासक्रमच निवडावा. यामध्ये संगणकीय ज्ञानामध्ये टॅली, डीटीपी, विद्युत उपक्रमामध्ये मोटार रिवायडींग, महिलांनी ब्युटी पार्लर, शिवणकाम आदी अभ्याक्रमाचे प्रशिक्षण घ्यावे, असे यावेळी ते म्हणाले.
कौशल्य विकास विभागाने प्रशिक्षण देण्याबरोबर इतर विभागांनीही समन्वयांनीच कार्य करावे, यामध्ये आरसेटी (RSETI)  ने महिलांना शिवणकलांचे प्रशिक्षण द्यावे, तर सर्व बँकांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांची कर्ज प्रकरणे सहानूभूती पूर्वक हाताळावीत व मुद्रा योजनेंतर्गत जास्तीत जास्त तरुण-तरुणींना रोजगारांसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याची सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यानी दिली.
कौशल्य विभाग, हिंगोली मार्फत देण्यात येणा-या महिला सुरक्षा रक्षकांच्या प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक करतांना जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले की, रोजगार व स्वयंरोजगार या दोन्ही गोष्टीवर सारखेच लक्ष देण्याची गरज असून महिलांनीही प्रशिक्षीत होवून सध्याच्या युगात आपल्या समोरील येणारी सर्व आव्हाने सोडवावीत असेही यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत दोन लाभार्थ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या देवून मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती रेणुका तम्मलवार म्हणाल्या की जिल्ह्यातील प्रमोद महाजन कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत  सुमारे 4 हजार 500 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण  देण्यात आले असून, त्यापैकी सुमारे 1 हजार 400 विद्यार्थ्यांनी रोजगार सुरु केले असल्याचे त्यांनी सांगितले.
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक गणेश दराडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकूण 54 लाभार्थ्यांना महामंडळामार्फत कर्ज वाटप करण्यात करण्यात आले असून त्यामधील 16 व्यक्तींना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी प्राथमिक स्वरुपात प्रशिक्षणार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती प्रियंका कनके यांनी केले तर आभार प्रवीण रुद्रकंठवार यांनी मानले.
*****


12 July, 2019

पालकमंत्री अतुल सावे यांचा जिल्हा दौरा





पालकमंत्री अतुल सावे यांचा जिल्हा दौरा

        हिंगोली, दि.12: उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            सोमवार दिनांक 15 जुलै 2019 रोजी सकाळी  10.00 वाजता वसमत जि. हिंगोली येथे आगमन, सकाळी 11.30 वाजता वसमत येथून हिंगोलीकडे रवाना, दुपारी 1.00 वाजता हिंगोली विश्रामगृह येथे आगमन, दुपारी 2.00 ते 2.30 वाजता राखीव, दुपारी 2.30 वाजता जिल्ह्यातील शासकीय विभागाची आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली),  सायंकाळी 6.00 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने परभणीकडे प्रयाण.