20 July, 2019

लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागांर्गत घेण्यात आलेल्या गट-क संवर्ग पदाकरीता निवड झालेल्या उमेदवारांची 22 ते 29 जूलै कालावधीत कागदपत्र पडताळणी



लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागांर्गत घेण्यात आलेल्या गट-क संवर्ग
पदाकरीता निवड झालेल्या उमेदवारांची 22 ते 29 जूलै कालावधीत कागदपत्र पडताळणी

हिंगोली,दि.20: संचालनालय, लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागातील लेखा लिपिक / लेखा परीक्षा लिपिक व कनिष्ठ लेखापाल , कनिष्ठ लेखा परीक्षक या गट क संवर्गाचे रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 9 जानेवारी 2019 रोजी ऑनलाईन  जाहिरात महापरीक्षा पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली होती. सदर पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 28 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 या कालावधीत  पार पडली आहे. ऑनलाईन  परीक्षेचा निकाल दिनांक 2 जुलै 2019 रोजी महापरीक्षा  पोर्टल संकेतस्थळ  www.mahapariksha.gov.in  वर प्रसिध्द   करण्यात आला आहे. विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखापरीक्षा औरंगाबाद विभाग यांच्या स्तरावर  निकाल पत्रातील उमेदवारांच्या गुणांनुसार  सामाजिक व समांतर आरक्षणाप्रमाणे  गुणानुक्रमे तात्पुरत्या विचाराधीन उमेदवारांची यादी तयार करण्यात आलेली आहे. संचालनालयाचे https:// mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर एम्प्लॉई कॉर्नर अंतर्गत रिक्रुटमेंट रुल्सवर दिनांक 20 जुलै पासून विभागनिहाय याद्या  प्रसिध्द करण्यात येत आहेत.
                यादीमध्ये नमूद उमेदवारांना या कार्यालयाकडून कागदपत्र पडताळणी करिता वैयक्तीकरित्या संपर्क करुन (ई-मेल, स्पीड पोस्ट, व इतर सामाजिक माध्यमाद्वारे) दिनांक 22 ते 29 जुलै 2019 या कालावधीमध्ये  उपस्थिती  बाबत कळविण्यात येणार आहे.  यादीमध्ये नमूद उमेदवारांना याबाबतची सूचना या कार्यालयाकडून दिनांक 24 जुलै पर्यंत प्राप्त न झाल्यास वरील नमूद कालावधीमध्ये आवश्यक ती सर्व मुळ कागदपत्र छायांकित प्रतींसह (2 संच) सहसंचालक, लेखा व कोषागारे, लेखा कोष भवन, जिल्हाधिकारी आवार, औरंगाबाद दूरध्वनी क्रमांक 0240-2340754/2331874 आणि सहसंचालक, स्थानिक निधी लेखा, लेखा कोष भवन, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, औरंगाबाद, दुरध्वनी क्र.0240-2344016 या विभागीय कार्यालयामध्ये दिनांक 22 ते 29 जुलै या कालावधीमध्ये कागदपत्र पडताळणी करिता उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष भरती प्रक्रीया संनियंत्रण समिती तथा सहसंचालक लेखा व कोषागारे, औरंगाबाद यांनी केले आहे.
****
               


No comments: