31 July, 2019

वयोश्री योजनेतंर्गत हिंगोली जिह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधनांसाठी नांव नोंदणी तपासणी शिबीराचे आयोजन



 वयोश्री योजनेतंर्गत हिंगोली जिह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम
अवयव सहाय्यभूत साधनांसाठी नांव नोंदणी तपासणी शिबीराचे आयोजन

        हिंगोली, दि.31: सामाजिक न्याय एवम अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, भारतीय कृत्रिम निर्माण निगम (एलिम्को) कानपूर, जिल्हा प्रशासन हिंगोली, जिल्हा अपंग पुर्नवसन केंद्र हिंगोली व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील 60 व 60 वर्षापूढील ज्येष्ठ नागरिकांना केंद्र शासनाच्या वयोश्री योजनेतंर्गत आवश्यकतेनुसार लागणाऱ्या साहाय्यभूत साधानाचे मोफत वाटप करण्यासाठी नांव नोंदणी व मोजमाप/तपासणी शिबीराचे जिल्ह्यात तालूकानिहाय आयोजन करण्यात आले आहे. 
या तपासणी शिबिरामध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना व्हिलचेअर, श्रवण यंत्र, कुबडी, सर्व प्रकारच्या काठ्या (वॉकींग स्टीक), वॉकर, रोलेटर्स, डोळ्याचे चष्‍मे, दाताची कवळी इत्यादी साहित्याचे वाटप करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात तालुकानिहाय पूर्व तपासणी  व नोंदणी शिबिराचे आयोजन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे.
            यामध्ये शुक्रवार दि. 02 ऑगस्ट, 2019 रोजी नर्सिंग महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, हिंगोली, शनिवार दि. 03 ऑगस्ट, 2019 रोजी उप जिल्हा रुग्णालय, वसमत, जि. हिंगोली, रविवार दि. 04 ऑगस्ट, 2019 रोजी ग्रामीण रुग्णालय, औंढा, जि. हिंगोली, सोमवार दि. 05 ऑगस्ट, 2019 रोजी ग्रामीण रुग्णालय, सेनगाव, जि. हिंगोली आणि मंगळवार दि. 06 ऑगस्ट, 2019 रोजी उप जिल्हा रुग्णालय, कळमनुरी, जि. हिंगोली याठिकाणी सकाळी 10.00 ते 4.00 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
वरील नमूद कालावधीत ज्येष्ठ नागरिकांनी आपले नांव नोंदणी व तपासणी करुन घ्यावे. लाभार्थ्यांनी येताना आधारकार्ड, बीपीएल पेन्शन कार्ड, अल्प उत्पन्न गटातील उत्पन्नाचा दाखला सोबत आणावा. अधिक माहितीसाठी जिल्हा अपंग पुनवर्संन केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय संबंधीत तालूक्यातील गट विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****


No comments: