नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.25: दुधाळ गाई, म्हशींचे
वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करणे या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित
जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील 18 वर्षावरील
अर्जदारांकडून दिनांक 25 जुलै ते 8 ऑगस्ट 2019 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात
येत आहेत. योजनेची पूर्ण माहिती व अर्ज करण्याची कार्यपध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर
व गुगल प्ले स्टोअर वरील AH MAHABMS या मोबाईल
ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी.
अर्ज भरताना
अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत एसएमएस द्वारे
संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदारने आपला भ्रमणध्वनी क्रमांक
योजनेअंतर्गत अंतिम निवड होईपर्यंत बदलू नये.
अर्जदारांची प्राथमिक निवड अर्जदाराने
ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार संगणकाद्वारे करण्यात येणार असली तरी अंतिम
निवड ही त्याने अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या
आधारेच करण्यात येईल. योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार)
, पंचायत समिती अथवा जिल्हा पशुसंवर्धन उप
आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, हिंगोली यांनी
केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment