23 July, 2019

डेंग्युच्या लक्षाणांकडे दुर्लक्ष करणे ठरेल धोकादायक



डेंग्युच्या लक्षाणांकडे दुर्लक्ष करणे ठरेल धोकादायक

        पावसाळ्यामध्ये डोकवर काढणारा डेंग्यू हा आजार अनेकांच्या मृत्युचेही कारण ठरतो. तर पावसाळा म्हणजे अनेक किटकांसोबतच डासांच्या प्रजनांचा काळ असतो. या वातावरणामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. सध्या देशात डेंग्यूच्या आजाराने थैमान  घातले असून, अनेक रुग्णांमध्ये  डेंग्यूची लक्षण आढळून येत आहेत. अनेकांना डेंग्युमुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. पण प्रत्येकवेळी  डेंग्यू  घातक ठरत नाही. जर  सुरुवातीच्या स्टेजला या आजाराची लक्षणे  ओळखता  आली तर डेंग्युवर उपचार करणे सहज शक्य होते. पण आज आम्ही  तुम्हाला  काही अशा लक्षाणाबाबत  सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला डेंग्युच्या आजाराने  गंभीर  रुप घेतले आहे हे समजणे  शक्य होईल.
पावसाळ्यामध्य जास्तीत-जास्त किटकांच्या प्रजननांचा काळ असतो. ज्यामुळे या दिवसांमध्ये डासांची पैदास  मोठ्या प्रमाणावर होत असते. यामुळे डेंग्यूचा व्हायरस आणि त्याचा संसर्ग  होण्याची शक्यता दुपटीने वाढते. ज्यामुळे डेंग्यू पसरण्याची शक्यता आणखी वाढते.
            डेंग्यूच्या घातक स्टेजमध्ये प्लेटलेट काऊंट फार कमी होतो. ज्यामुळे रुग्णांच्या आरोग्यासोबतच त्याच्या जीवालाही धोका असतो. पण प्रत्येकवेळी डेंग्यूला घाबरण्याची गरज नाही. काही घरगुती उपायानीही डेंग्यूवर नियंत्रण मिळवू शकता.
            द हेल्थ साईटने दिलेल्या वृत्तानुसार डेंग्युची लागण झाल्याने 3 ते 7 दिवसानंतर योग्य उपचार घेतले नाही तर हा फार गंभीर  रुप धारण करु शकतो. अनेकदा या स्टेजमध्ये रुग्णांच्या शरीराचे तापमान कमी होऊ लागत, हे लक्षण पटकन  लक्षात येत नाही. अनेकदा रुग्णाचा ताप निवळून तो बरा होत असल्याचे वाटते. पण अनेकदा हा गैरसमज ठरवू शकतो. हे कदाचित डेंग्यूचे घातक लक्षण ठरु शकते.
            पोटदुखी, सतत उलट्या होणे किंवा उलटीमधून रक्त पडणे, हिरड्यामधून रक्त येणं, श्वास घेण्यास त्रास होण, लठ्ठपणा आणि थकवा ही लक्षणे या आजारात सामान्यपणे दिसून येतात. या लक्षणांपैकी एक जरी लक्षण रुग्णांमध्ये आढळून आले तर किरकोळ उपचार करीत अशा लक्षणांकडे अजिबात‍ दुर्लक्ष करु नये अस करणे रुग्णांच्या जीवावरही बेतू शकते.
            सन 2018-19 या वर्षामध्ये जिल्हा हिवताप कार्यालय, हिंगोली मार्फत जिल्ह्यामधील  एकूण 201 संशयित डेंग्यू रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी परभणी येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले होते. त्यापैकी 18 डेंग्यू  दुषित रुग्ण  जिल्ह्यामध्ये आढळून आलेले आहेत. जिल्ह्यामध्ये  ज्या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण  आढळून  आलेले आहेत.  त्या ठिकाणी  या कार्यालयाचे  साथरोग  पथकामार्फत  किटकशास्त्रीय  सर्व्हेक्षण  करुन 100 टक्के  घरांमध्ये ॲबेटींग करण्यात आली . तसेच ज्या गावांमध्ये किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे अशा एकूण 32 गावांमध्ये या कार्यालयाच्या पथकामार्फत  धुर फवारणी करण्यात आली .
            डेंग्यूच्या लक्षणांकडे  दुर्लक्ष करणे ठरेल धोकादायक त्यामुळे आजिबात वेळ व घालवता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत व सद्य:स्थितीस पारेषण काळ सुरु असल्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून  एक दिवस  पाळण्याबाबत व सभोवतालचा परिसर, नाल्या, गटारे, डबके इत्यादी साचू देऊ नयेत जेनेकरुन डासांची उत्पत्ती होणार नाही व किटकजन्य आजाराची समस्या  उद्भवणार नाही .
****



No comments: