व्यायामशाळा विकास,क्रीडांगण
विकास,युवक कल्याण अनुदानासाठी
प्रस्ताव सादर
करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 11 : सन
2019-20 या आर्थिक वर्षात व्यायामशाळा विकास, क्रीडांगण विकास,युवक कल्याण (सर्व साधारण/विशेष
घटक/आदिवासी) योजनेअंतर्गत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
तसेच ज्या संस्थांना
व्यायामशाळा विकास, क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत सन 2018-19 मध्ये प्रथम हफ्ता/व्दितीय
हफ्ता वितरीत करण्यात आला त्या संस्थांनी आपल्या उर्वरीत अनुदानासाठी, साहित्यासाठी
प्रस्ताव सादर करावेत.
तसेच नवीन व्यायामशाळा विकास अनुदान योजनेसाठी नवीन
शासन निर्णय दि. 08 जानेवारी 2019 नुसार शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय
रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अनुदानीत शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद,
सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह, शासकीय
उप जिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय, शासनाने मान्यता दिलेल्या अनुदानित शैक्षणिक शाळा, महाविद्यालय, पोलिस
कल्याण निधी/ पोलिस विभाग, शासकिय कार्यालय इ. कडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
(सेवाभावी संस्था, व्यायामशाळा, क्रीडा मंडळ, महिला मंडळ इ.हे अपात्र आहेत. यांनी प्रस्ताव
सादर करुन नयेत)
तसेच युवक कल्याण विषयक
अनुदान योजना सन 2018-19 या आर्थिक वर्षात ज्या संस्थांना अनुदान देण्यात आले आहे अशा
संस्थांनी कार्यक्रमाचा अहवाल, विनियोग प्रमाणपत्र, ऑडीट रिपोर्ट प्रस्तावासोबत सादर
करावेत. तसेच धर्मादाय आयुक्त, हिंगोली यांनी
रद्द केलेल्या संस्थांनी प्रस्ताव सादर करु नयेत. कार्यक्रमाचा अहवाल, विनियोग प्रमाणपत्र
सादर न केल्यास सदरील संस्था अपात्र करण्यात येईल.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत विहित अर्जाचे नमुने दि.11 ते 20 जुलै 2019 या कालावधीत दुपारी 12.00 ते
3.00 वा. या वेळेत विक्रीस उपलब्ध आहेत. परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख
दि.25 जुलै 2019 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंत राहील. विहित मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव
स्विकारले जाणार नाहीत, तरी इच्छुकांनी परिपूर्ण प्रस्ताव विहित नमुन्यात व वेळेत सादर
करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment