वाहन धारकांनी HSRP नंबर प्लेट वाहन वितरकांकडून बसवून घेण्याचे
आवाहन
हिंगोली, दि.10 : रस्ते वाहतुक महामार्ग मंत्रालय यांचे
निर्देशानुसार दिनांक 1 एप्रिल 2019 पासून नवीन उत्पादीत होणाऱ्या वाहनांना
HSRP नंबर प्लेट बसविण्याबाबत अधिसूचना
जारी करण्यात आलेली आहे. त्या नुसार दिनांक 1 एप्रिल 2019 नंतर उत्पादित होणाऱ्या
वाहनांना केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. त्यानुसार
वाहन वितरकांद्वारे ही नंबर प्लेट बसविण्यात येणार आहे. तरी सर्व वाहन धारकांनी
HSRP नंबर प्लेट वाहन वितरकांकडून बसवून
घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन
अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment