इमारत व इतर बांधकाम कामगारांनी
नोंदणी करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.04 : महाराष्ट्र
शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या रोजगार व सेवा शर्तींचे नियमन करणे व
त्यांना सुरक्षा, आरोग्य व कल्याणकारी मंडळ या मंडळाची स्थापना केलेली आहे.
सद्य:स्थितीत या मंडळाचे कामकाज सरकारी कामगार अधिकारी , हिंगोली कार्यालयामार्फत
चालविण्यात येत असून शासन अधिसूचनेद्वारे बांधकामाच्या व्याख्येत समावेश करण्यात
आलेल्या 21 बांधकाम व्यवसायाशी निगडीत व्यवसायात काम करणाऱ्या वय 18 ते 60
वर्षे असणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यात
येते. त्यानुसार माहे जून 2019 पर्यंत जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 24 हजार 360
कामगारांची नोंदणी झालेली आहे.
या
नोंदणीकृत कामगारांना कामगार मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभाचे वाटप
करण्यात येते. यामध्ये कामगारांसह
त्यांच्या पत्नी व अपत्यांचा देखील समावेश असून त्यांना प्रसुतीसाठी , गंभीर
आजारांच्या उपचारासाठी, कामावर असताना अपघातामुळे अपंगत्व आल्यास किंवा मृत्यु
झाल्यास , विवाहासाठी, कामगारांच्या अपत्यांना पहिली पासून ते पदवीपर्यंतचे शिक्षण
इत्यादी बाबींसाठी कामगार मंडळामार्फत त्यांना अर्थसहाय्य करण्यात येते .
जिल्ह्यातील
सर्व इमारत व इतर बांधकाम कामगारांनी
नोंदणी शुल्क रु. 37/- व नुतनीकरण शुल्क रु. 12/- इतके वार्षिक शुल्क भरुन सरकारी कामगार
अधिकारी कार्यालय, डी.आर.टी. 10, पलटन, हिंगोली येथे नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा
सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment