छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजना तक्रार निवारणासाठी समिती गठीत
हिंगोली,दि.29: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेची अंमलबजावणी हिंगोली
जिल्ह्यामध्ये सुरु आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा शासन निर्णय क्रमांक :संकीर्ण 0719/प्र.क्र.87/2-स
दि. 12, जुलै, 2019 अन्वये तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे.
त्यानुसार तालुकास्तरीय समिती
प्रत्येक आठवडयात कर्जमाफी योजनेबाबतच्या शेतक-यांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी
तसेच योजनेचा लाभ मिळालेल्या शेतक-यांच्या खरीप 2019 पीक कर्ज वाटपाबाबतच्या तक्रारींचे
निवारण करण्यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात येत आहेत,योजनेमध्ये पात्र खातेदार तसेच
काही कारणास्तव पात्रता धारण करत नसलेले खातेदार
अशा दोन प्रकारच्या यादया जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, हिंगोली या कार्यालयास प्राप्त
झालेल्या यादया जिल्हयातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था ता.हिंगोली/वसमत/कळमनुरी/औंढा
ना./सेनगाव यांचे कार्यालयास शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, तालुकास्तरीय समितीमध्ये
तक्रार घेऊन येणा-या शेतक-याचे नाव उपरोक्तप्रमाणे प्राप्त झालेल्या यादीमध्ये असल्याबाबत
खात्री करावी. संबंधीत शेतक-यांना कांही तक्रार असल्यास तालुकास्तरीय समिती कडे देण्यात
यावी,शेतक-याचे नाव ग्रीन लीस्टमध्ये असल्यास संबंधीत शेतक-यास योजनेचा लाभ मिळाल्याबाबत
खातरजमा करावी व शेतक-याचे नाव काही कारणास्तव अपात्र होत असल्यास नेमके अपात्रतेच्या
कारणाची माहिती तालुकास्तरीय समितीने दयावी,तालुकास्तरीय
समितीस अपात्रतेच्या कारणामध्ये विसंगती असल्याचे आढळल्यास अशा कर्जखात्यांची संबंधीत
बँकेकडून पुनश्च तपासणी करुन शेतक-याच्या म्हणण्यामध्ये तथ्य आढळल्यास अशा कर्जखात्यामध्ये
आवश्यक ती सुधारणा करुन सदर कर्जखाते पोर्टलवर
पुन्हा अपलोड करावयाची कार्यवाही करावी,संबंधीत शेतक-याचे नाव उपरोक्त प्रमाणे नमूद
केलेल्या दोन्ही यादयामध्ये नसल्यास संबंधीत शेतक-योच नाव, गाव, ॲप्लीकेशन आयडी, बँक
व शाखा, कर्जखाते क्रमांक इ. माहिती घ्यावी व सर्व तालुकास्तरीय समित्यांनी तक्रार
निवारण दिवशी प्राप्त झालेल्या अशा सर्व तक्रारींचे एकत्रीकरण करावे व अशी यादी (संबंधीत
माहितीसह) त्याच दिवशी संबंधीत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना ई मेलद्वारे सहकार
आयुक्त यांनी निश्चित केलेल्या विवरणपत्रामध्ये सादर करावी. संबंधीत जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था यांनी अशा सर्व तालुक्याची यादी शासनाकडे, सहकार आयुक्तांकडे व संबंधीत
विभागीय सहनिबंधक यांचेकडे ईमेल द्वारे पाठविण्यात येईल,जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था
यांच्याकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार महाऑनलाईन यांचेकडून अशा कर्जखात्यांबाबतची
माहिती घेऊन संबंधीत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना देण्यात येईल,शेतक-याचे नाव
उपरोक्तप्रामणे दोन्ही यादयामध्ये नसल्यास संबंधीत बँकेने कर्जखाते पोर्टलवर अपलोड
केलेले असल्याबाबत खात्री करावी. सदर कर्जखाते संबंधीत बँकेने पोर्टलवर अपलोड केले
नसल्यास अशा कर्जखात्याची तपासणी करुन त्वरीत पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात
येईल,प्रत्येक तालुकास्तरीय समिती योजनेमध्ये लाभ मिळालेल्या पात्र शेतक-यास संबंधीत
बँकेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असल्यास व शेतक-याने मागणी केली असल्यास असे पीक कर्ज
संबंधीत शेतक-यास मिळाले आहे किंवा कसे, याची खातरजमा करेल,जिल्हा उपनिबंधक यांनी त्यांच्या
अधिनस्त असलेल्या प्रत्येक तालुक्यातील समितीने याबाबत केलेल्या कामकाजाचा अहवाल नियमितपणे
सहकार आयुक्त व विभागीय सहनिबंधक यांना सादर करावा. प्रत्येक तालुकास्तरीय समितीने
आपले कामकाज प्रभावीपणे पार पाडणेबाबत दक्षता घ्यावी. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी
संस्था यांनी सर्व तालुकास्तरीय समितीच्या कामकाजावर देखरेख ठेवावी व त्यांना येणा-या
अडचणीचे निरसन करुन सदर कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्याबाबत उपाययोजना करावी. तालुकास्तरीय
समितीची सभा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था ता.हिंगोली/वसमत/कळमनुरी/औंढाना/सेनगाव
यांचे कार्यालयास प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 या वेळेत
आयोजीत करण्यात येणार आहे.
सदर समिती सभेवेळी संबंधीत
अर्जदार व बँक शाखा प्रतिनिधी यांना बोलावून अर्जाचा निपटारा जलद गतीने करण्यात येणार
आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
2017 या योजनेच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी गठीत समितीने करावयाच्या कामकाजाबाबत
जास्तीत-जास्त शेतक-यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था ता.हिंगोली /वसमत /कळमनुरी
/औंढाना /सेनगाव यांचे कार्यालयात अर्ज करुन योजनेमध्ये त्यांच्या पात्र/अपात्रतेची
खातरजमा करण्यात यावी ,असे आवाहन हिंगोलीचे जिल्हा उपनिबंधक सु. प्र. मेत्रेवार यांनी
केले आहे.
*****
No comments:
Post a Comment