सामाजिक न्याय विभाग व विशेष
सहाय्य विभागाच्या अधिनस्त वसतिगृहामध्ये
प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.05 : सामाजिक
न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त मागासवर्गीय मुलां/मुलींचे एकूण आठ
शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत. सदर
वसतिगृहामध्ये सन 2019-20 या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेशासाठी इयत्ता 7 वी, 10 वी
व 12 वी व पदवी उत्तीर्ण झालेल्या मागासवर्गीय पात्र मुलां/मुलींनी अर्ज
करण्यासाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत.
शालेय
विद्यार्थ्यांसाठी दिनांक 15 जून ते 4 जुलै 2019 पर्यंत संबंधित वसतिगृहात अर्ज सादर
करावयाचे आहेत. पहिली निवड यादी
दिनांक 7 जुलै 2019 रोजी , दुसरी यादी (पहिल्या यादीमधील प्रतिक्षा यादीत नमूद
विद्यार्थ्यांची यादी) दि. 22 जुलै रोजी, पहिल्या व दुसऱ्या निवड यादीतील जागा
रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन दिनांक 5 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिध्द करण्यात येणार
आहे.
इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी (व्यावसाईक अभ्यासक्रम वगळून) दिनांक 15 जून ते
14 जुलै 2019 पर्यंत संबंधित वसतिगृहात
अर्ज सादर करावयाचे आहेत. पहिली निवड यादी
दिनांक 15 जुलै 2019 रोजी दुसरी यादी (पहिल्या यादीमधील प्रतिक्षायादीत नमूद
विद्यार्थ्यांची यादी ) दिनांक 10 ऑगस्ट 2019 रोजी पहिल्या व दुसऱ्या निवड यादीतील
जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन दिनांक 21 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिध्द करण्यात
येणार आहे.
बी.ए.,
बी.कॉम. बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका /
पदवी आणि एम. ए., एम. कॉम., एम. एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर , पदवी व
पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) दिनांक 15 जून ते 24
जुलै 2019 पर्यंत संबंधित वसतिगृहात अर्ज सादर करावयाचे आहेत. पहिली निवड यादी दि.
27 जुलै 2019 रोजी दुसऱ्या निवड यादीतील जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन दिनांक
30 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
व्यावसायिक
अभ्यासक्रम दिनांक 15 जुलै ते 28 ऑगस्ट 2019 पर्यंत संबंधित वसतिगृहात सादर करावयाचे
आहेत. पहिली निवड यादी दिनांक 31 ऑगस्ट 2019 रोजी, दुसरी यादी (पहिल्या यादीमधील
प्रतिक्षायादीत नमूद विद्यार्थ्यांची यादी ) दिनांक 9 सप्टेंबर 2019 रोजी ,
पहिल्या व दुसऱ्या निवड यादीतील जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन दिनांक 18
सप्टेंबर 2019 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. सदर वसतिगृहातील अनाथ व अपंग विद्यार्थ्यांसाठी नियमानुसार
स्वतंत्र राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.
यासाठी
पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने त्या- त्या तालुक्यातील
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृहात अर्ज सादर
करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण , हिंगोली यांनी केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment