महिला लोकशाही दिनाचे 15 जुलै रोजी आयोजन
हिंगोली, दि.12: राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला
समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व
पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या
हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी यांची शासकीय
यंत्रणेकडून होण्यासाठी व समाजातील पिडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध
व्हावी यासाठी एक
प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
त्यांच्या दालनात दिनांक 15 जुलै 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता महिला लोकशाही दिन
होणार आहे.
ज्या महिलांना तक्रारी करावयाच्या
असतील त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात मध्यवर्ती
प्रशासकीय इमारत हिंगोली यांच्या कार्यालयात तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्हि.जी. शिंदे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment