29 May, 2020

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी साधणार जनतेशी संवाद


फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी साधणार जनतेशी संवाद

        हिंगोली,दि.29: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.
            जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्या ‘DIO Hingoli’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून नागरिकांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी मंगळवार, दि. 2 जून, 2020 रोजी सायंकाळी 4:30 वाजता संवाद साधता येणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांकरीता जिल्हा प्रशासन काय करत आहे ? येणाऱ्या कालावधीत नागरिकांनी कोणत्या निर्देशाचे पालन करावयाचे आहे, आपात्कालीन कालावधीत नागरिकांना कोणत्या माध्यमातून मदत मिळेल, याबरोबरच संवाद कार्यक्रमाच्या दरम्यान ‘DIO Hingoli’ या फेसबुक पेजच्या कंमेन्ट बॉक्स च्या माध्यमातून नागरिकांना आपल्या अडचणी, उपयुक्त सूचना, प्रश्न जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना विचारता येणार असून जिल्हाधिकारी या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना किंवा प्रश्न पाठवतांना आपले ठिकाण व तालुका आवर्जून नमूद करावा. हिंगोलीकरांनी या फेसबुक लाईव्ह संवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी  व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
****


हिंगोलीत एक नवीन रुग्ण तर पाच जण कोरोनामुक्त


हिंगोलीत एक नवीन रुग्ण तर पाच जण कोरोनामुक्त

हिंगोली, दि.29:  वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या पाच कोविड-19 रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने  ते कोरोनामुक्त झाल्याने त्यांना दि. 28 मे रोजी डिस्जार्च देण्यात आला. तर वसमत तालुक्यातील एका 42 वर्षीय पुरुषाला कोविड-19 ची लागण झाली आहे.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 166  व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 96 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात सद्यस्थितीत 70 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
0000



28 May, 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन





जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर
 यांना जयंतीनिमित्त अभिवादन

हिंगोली,दि.28 : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जयंती येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
यावेळी  अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी,  कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार व विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
  ****


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात होणार ऑनलाईन पध्दतीने कामकाज


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन
कार्यालयात होणार ऑनलाईन पध्दतीने कामकाज

हिंगोली, दि.28: राज्यामध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनातर्फे आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असून याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. सद्यस्थितीमध्ये राज्याची जिल्हानिहाय विभागीणी रेड झोन व रेड झोन व्यतिरिक्त अशी करण्यात आली आहे. उप प्रादेशिक परिवहन हे कार्यालय सुरु करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. शासनाने घोषित  केलेल्या विविध झोनमधील कार्यालयांमध्ये करावयाच्या कामकाजाची यादी पुढीलप्रमाणे आहे-नवीन वाहनांची नोंदणी, वाहन विषयक कामे जसे वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा चढविणे-उतरविणे, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, परवाना विषयक कामे,अनुज्ञप्ती विषयक इतर कामे जसे दुय्यमीकरण, नुतनीकरण,अंमलबजावणी विषयक कामे इत्यादी.
तसेच उपरोक्त कामे करतांना- सर्व वाहन धारकांनी मोटार वाहन कर अनिवार्यपणे ऑनलाईन पध्दतीनेच भरणा करावयाचा आहे. रेड झोन वगळून इतर कार्यक्षेत्रामध्ये वाहन विषयक व कामांकरिता ऑनलाईन अपॉईंमेंट पध्दतीने अर्ज घेण्याबाबत सूचित केले आहे. त्यानुसार वरील कामकाजाचे अर्ज हे ऑनलाईन अपॉईंमेंट ज्या दिनांकास प्राप्त झालेली आहे त्याच दिवशी अर्जदाराचे अर्ज कार्यालयात स्विकारण्यात येणार असल्याने कार्यालयामध्ये गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच याकरिता दोन व्यक्तींमध्ये किमान 6 फुटाचे अंतर ठेवण्यात यावे. एका व्यक्तीकडून एकच अर्ज स्विकारण्यात येणार आहे. प्राप्त झालेली कागदपत्रे ही निर्जंतुकीकरण केल्यानंतर व कमीत कमी हाताळण्याबाबत सूचित केले असल्यामुळे वरील कामकाजासाठी या कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज हे विहित कालमर्यादेमध्ये होणार असल्यामुळे अर्जदारांनी कार्यालयामध्ये गर्दी करु नये. कार्यालयामध्ये योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनाचे निर्जंतुकीकरण पूर्णत: वाहन मालकाच्या, धारकाच्या, खर्चाने करुन वाहन योग्यता प्रमाणपत्राच्या नुतनीकरणासाठी सादर करावयाचे आहे. या सर्व बाबींची खातरजमा झाल्यानंतरच कार्यालयातील कामे सुरु होणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****

27 May, 2020

जिल्ह्याकरीता प्रतिबंधीत व प्रतिबंध मुक्तचे नवीन आदेश


जिल्ह्याकरीता प्रतिबंधीत व प्रतिबंध मुक्तचे नवीन आदेश

हिंगोली,दि.27:  राज्‍य शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजीपासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना कोविड-19 नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आदेशानुसार जिल्ह्यात करावयाच्या उपाययोजनाबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता यापूर्वीचे दुकान व उद्योग सुरु ठेवण्याचे सर्व आदेश रद्द करुन खालीलप्रमाणे प्रतिबंधीत व प्रतिबंध मुक्त करावयाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
या आदेशान्वये  जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस (खाजगी शिकवणी वर्ग), बंद राहणार असून ऑनलाईन शिकवणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच हॉटेल, रेस्टारंट आणि आदीरातीथ्य सेवा बंद राहणार आहेत. परंतू या सेवा आरोग्य, पोलीस, शासकीय अधिकारी/ कर्मचारी , वैद्यकीय कर्मचारी, अडकून पडलेले व्यक्ती व पर्यटक आणि अलगीकरण केंद्रात सुरु असलेल्या सेवा व बस स्थानक व रेल्वे स्थानकावरील चालू असलेल्या हॉटेल सेवा (सुरु राहतील) यांना लागू राहणार नाहीत. हॉटेल, रेस्टारंट व खानावळ यांच्या सेवा फक्त घरपोच वितरणासाठी सुरु ठेवता येणार आहेत. सर्व सिनेमा गृह, केश कर्तनालय, स्पा, शॉपींग मॉल, व्यायामशाळा, जलतरण पूल, करमणुकीचे ठिकाणे, थिएटर, बार, सभागृहे, मंगल कार्यालये इत्यादी बंद राहणार आहेत. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा विषयक, करमणूक विषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येऊन साजरे होणारे कार्यक्रम घेण्यावर बंदी राहणार आहेत. तसेच सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे सर्व नागरिकांसाठी व धार्मिक कार्यक्रमासाठी बंद राहणार आहेत.
तर क्रीडा संकुल, क्रीडा मैदाने व इतर सार्वजनिक खुली मैदाने वैयक्तिक व्यायामाकरिता चालू राहणार आहेत. परंतू प्रेक्षक व सामुहिक कार्यक्रमासाठी अशा ठिकाणी बंदी करण्यात आली आहे. सर्व शारिरीक व्यायाम व इतर हालचाली सामाजिक व सुरक्षित अंतर ठेवून करता येणार आहे.  सर्व खाजगी व सार्वजनिक वाहतुक करतांना दूचाकी वाहन केवळ एक व्यक्तीसाठी, तीन चाकी वाहन एक + दोन व्यक्तींसाठी व चार चाकी वाहन एक + दोन व्यक्तींसाठी वापरता येणार आहेत.
जिल्हातंर्गत बस वाहतुक सेवा प्रती बस वाहन क्षमतेच्या 50 टक्के पर्यंतच्या मर्यादेत शारिरीक व सामाजिक अंतराचे पालन करुन व सॅनिटायझेशन मेझर्सचे पालन करुन सुरु करता येणार आहे. कंटेनमेंट झोन मधील गावे व भागातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळून जिल्ह्यातंर्गत सर्व दुकाने, उद्योग, व्यवसाय, आस्थापना दररोज सकाळी 9.00 ते 5.00 यावेळेत  खालील अटींच्या  अधिन राहून सुरु ठेवता येणार आहे. तर रात्री 7.00 ते सकाळी 7.00 यावेळेत जिल्ह्यात संपूर्ण संचार बंदी लागू असणार आहे.
याकरीता पुढील नियमाचे पालन करणे आवश्यक असणार आहे. दुकानातील मालक, कर्मचारी, ग्राहक व इत्यादी यांच्या चेहऱ्यावर मास्क घालणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी दुकानाच्या व आस्थापनाच्या परिसरात व इतर ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणे तसेच दुकानच्या परिसरात  सामाजिक अंतर राखणे बंधनकारक असेल. सार्वजनिक ठिकाणी तसेच दुकानाच्या परिसरात मद्यपान, तंबाकू, गुटखा, पान इत्यादींचे सेवनास प्रतिबंध असेल. एका वेळेस दुकानात पाच पेक्षा जास्त ग्राहकास प्रवेश राहणार नाही. तसेच सामाजिक अंतर राखण्यासाठी दुकानाबाहेर एक मीटर अंतरावर ग्राहकांना उभे राहण्यासाठी गोल, चौकोन आखून लागेल. कामाच्या ठिकाणी, दुकानात प्रवेशापूर्वी हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे दुकानातील मालक, कर्मचारी, ग्राहक व इत्यादींना बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच दुकान, आस्थापना, उद्योग इत्यादी ठिकाणी मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू ठिकाणाचे वेळोवेळी नियमित निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असणार आहे. ग्राहकाकडून खरेदीनंतर पैशाची देवाण-घेवाण आरबीआयच्या सूचनेनुसार ई-वॉलेट्स व स्वाईप मशिनद्वारे करण्यावर भर द्यावा असे आदेशात नमूद केले आहे.
वरील सर्व आदेशाची अवज्ञा करणाऱ्या संबंधिताने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असे  रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहेत.

****




हिंगोलीत चार नवीन कोरोना बाधीत रुग्ण


हिंगोलीत चार नवीन कोरोना बाधीत रुग्ण
·   सद्यस्थितीत जिल्ह्यात 74 कोरोना बाधीत रुग्ण
·   मृत नगर पालिका कर्मचाऱ्याचा अहवाल निगेटीव्ह

हिंगोली, दि.27: हिंगोली तालूक्यातील पहेणी येथील एका वर्षीय बालक तसेच वसमत तालुक्यातील हट्टा येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये भरती असलेल्या 29 वर्षीय पुरुष आणि औंढा येथील कोरोना केअर सेंटर मध्ये भरती दोन व्यक्ती असे एकुण चार जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
तसेच ज्या नगर पालिका कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाला होता त्याचा कोवीड-19 चा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 164 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 90 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 74 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****


26 May, 2020

बाल सरंक्षण कक्षाच्या सतर्कतेने नियोजीत बाल विवाह टळला


बाल सरंक्षण कक्षाच्या सतर्कतेने नियोजीत बाल विवाह टळला

हिंगोली,दि.26: वसमत तालुक्यातील एका 14 वर्षीय मुलीचा विवाह दि.26 मे, 2020  रोजी नियोजित होता. 25मे रोजी बाल विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही.जी.शिंदे यांना प्राप्त होताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार बाल विवाह रोखण्यात आला.
मुलीचे आई-वडील आणि चुलता यांना बाल विवाह कायदा 2006 नुसार बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच बाल विवाह केल्यामुळे मुला-मुलीवर होणारे दुष्परिणाम शारिरीक व मानसिक घटकांवर होणारे दूरगामी परिणाम तसेच कायद्याचा भंग केल्यास योग्य ती कारवाई होवू शकते अशी समज दिल्यावर मुलीच्या कुटूंबातील सदस्य बालविवाह थांबविण्यास तयार झाले.
बालविवाह थांबविण्याबाबत कुटूंबाकडून लेखी जबाब घेण्यात आला. सदर बालविवाह रोखण्यात चाईल्ड लाईन हिंगोलीचे टिम सदस्य तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर गावातील बालविवाह प्रतिबंध अधिकारी ग्रामसेवक, सरपंच, मुख्याध्यापक, पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी बालविवाह रोखण्यास सहकार्य केले, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
****



हिंगोली तालूक्यातील पेहणी गाव कंटेनमेंट झोन घोषीत


हिंगोली तालूक्यातील पेहणी गाव कंटेनमेंट झोन घोषीत

हिंगोली,दि.26: जिल्ह्यातील काही भागात कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा इतरत्र प्रादूर्भाव होवू नये, याकरीता हिंगोली तालूक्यातील पेहणी गावाचा कंटेनमेंट झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
 वरील कंटेनमेंट झोन परिसरातील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आले असून सर्व आवश्यक सेवा या भागात बंद करण्यात आल्या आहेत. या सेवा ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत. या कंटेनमेंट झोन आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड सहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.   
****



25 May, 2020

जिल्हा प्रशासनामार्फत महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन

हिंगोली, दि.25: महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी ही यावेळी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
****


हिंगोलीत नवीन 8 कोरोना बाधीत रुग्ण



हिंगोली, दि.25: कळमनुरी तालुक्यात मुंबई येथून 4 तर रायगड येथून 3 आणि पुण्यातून 1 असे एकूण 8 परतलेल्या व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 159 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 90 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 69 कोरोना बाधीत रुग्ण भरती असून त्यांच्यावर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये. तसेच  घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****


24 May, 2020

हिंगोली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील काही क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषीत



हिंगोली,दि.24: जिल्ह्यातील काही भागात कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा इतरत्र प्रादूर्भाव होवू नये याकरीता जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील काही भाग हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. या कंटेनमेंट झोन मध्ये हिंगोली शहरी भागातील सिध्दार्थ नगर-जवळा पळशी रोडची डावी बाजू, बागवानपूरा-तलाब कट्टा मस्जीदच्या पाठीमागे आणि गुहा चौक-पेन्शनपूरा या भागाचा समावेश आहे.
तसेच ग्रामीण भागात हिंगोली तालूक्यातील बासंबा, खंडाळा, इंचा, वडद, माळसेलु, लिंबाळा, गंगानगर (कारवाडी ग्रामपंचायत क्षेत्र) आणि आनंदनगर (बळसोंड ग्रामपंचायत क्षेत्र) तर सेनगाव तालूक्यातील माझोड, बरडा, खुडज आणि सुरजखेडा हे गावे कंटेनमेंट झोनमध्ये आहेत.
 वरील कंटेनमेंट झोन परिसरातील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आले असून सर्व आवश्यक सेवा या भागात बंद करण्यात आल्या आहेत. या सेवा ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत. या कंटेनमेंट झोन आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड सहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.   
****



हिंगोलीत 62 कोरोना बाधीत रुग्ण



हिंगोली, दि.24: सेनगाव तालुक्यात मुंबई येथून 10 तर दिल्ली येथून 03 अशा एकूण 13 परतलेल्या व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
तर हिंगोलीतील लिंबाळा येथे तयार करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटर मध्ये 31 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये 22 मुंबई येथून तर औरंगाबाद 04, रायगड 01, बिदर (कर्नाटक)  01 हून हिंगोली तालुक्यात परतले आहेत. तर 02 रुग्ण हे भिरडा येथील बाधीत रुग्णाच्या संपर्कातील आहेत. आणि 01 समुदाय आरोग्य अधिकारी असे एकूण 31 रुग्णांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.
तसेच औरंगाबाद येथील रुग्णालयात 02 रुग्ण भरती आहेत. तर वसमत येथील कोरोना केअर सेंटर मध्ये 13 रुग्ण आणि हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 03 असे एकूण 62 रुग्णांवर जिल्ह्यात सद्यपरिस्थीतीत उपचार सुरु आहेत.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 151 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 89 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 62 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****

23 May, 2020

हिंगोलीत 6 नवीन कोरोना बाधीत रुग्ण


·   सद्यस्थितीत जिल्ह्यात 18 कोरोना बाधीत रुग्ण

हिंगोली, दि.23: मुंबई येथून वसमत तालूक्यात 5 तर  औंढा तालूक्यात 1 परतलेल्या एकुण 06 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे आज प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या सर्व बाधीत रुग्णांना वसमत आणि औंढा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 107 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 89 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 18 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****

21 May, 2020

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा


हिंगोली,दि.21: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणुन सर्वत्र पाळला जातो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली.
             यावेळी अपर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी यांची  उपस्थिती होती.

****



20 May, 2020

हिंगोलीत नवीन कोरोना बाधीत एका रुग्णाची नोंद


·   जिल्ह्यात एकुण 15 कोरोना बाधीत रुग्ण

हिंगोली दि.20: मुंबई येथून जिल्ह्यात परतलेल्या 01 व्यक्तींस कोविड-19 ची लागण झाल्याचे आज प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले असून त्यास क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. सदर बाधीत रुग्ण  वसमत येथील बाधीत असलेल्या रुग्णांसोबत मुंबई येथे कामाला होता.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 100 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले असून त्यातील 85 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
****

18 May, 2020

आरबीआयने नि‍श्चत केलेल्या वेळापत्रकानुसार आजपासून बँकाचे कामकाज राहणार सुरु


आरबीआयने नि‍श्चत केलेल्या वेळापत्रकानुसार
आजपासून बँकाचे कामकाज राहणार सुरु

हिंगोली, दि.18: जागतिक आरोग्य संघटनेने करोना (कोव्हीड-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्य शासनाने करोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 कायद्यातील खंड 2, 3 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमीत  केली आहे.  त्याबाबतची  नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. तसेच भारत सरकार आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाने जाहीर  केल्याप्रमाणे करोनाग्रस्त रुग्णाचे इतर लोकांनी संपर्कात येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होवू नये याकरीता फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सर्व बॅंकाचे व्यवहार आरबीआय ने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार दि. 18 मे, 2020 पासून खातेदारांसाठी सकाळी 10.00 ते दूपारी 3.00 वाजेपर्यंत अटी व शर्तीच्या अधीन राहून अर्थिक व्यवहार करता येणार आहे.
सर्व बँकांनी कामाची सुरुवात करण्यापूर्वी संपुर्ण जागेचे सेनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. गर्दी टाळण्यासाठी  एक ते दोन मिटर अंतरावर गोल/चौकोन आखण्यात यावेत. बँकेत आलेले खातेदार आखलेल्या गोल / चौकोना मध्येच उभे राहतील याचे नियोजन करावे. खातेदाराना टोकन देण्यात यावेत,   टोकन नुसारच व्यवहार करावेत. टोकननुसार नंबर आल्याची खातेदारांना माहिती होण्याकरीता Public Announcement System बसविण्यात यावी. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रिकामे जागेत मंडप / शामीयाना उभारून तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. खातेदार, सुरक्षा रक्षक, बँक कर्मचारी अधिकारी यांचे सुरक्षेसाठी मास्क सॅनीटायझराचा वापर करणेबाबत सर्व संबंधितांना सांगावे त्याचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. एकाच वेळी बॅंकेमध्ये  5 पेक्षा जास्त व्यक्तीस प्रवेश देवू नये. दररोज कामावर येणाऱ्या अधिकारी /कर्मचाऱ्याची तसेच खातेदारांची तपासणी थर्मल गनच्या सहाय्याने करण्यात यावी. परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची व हात  धुण्याची व्यवस्था व साबण याची व्यवस्था करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील यांची ही दक्षता घ्यावी. शासनाने ठरवुन दिलेल्या अंतराच्या परीसीमांचे तंतोतंत पालन करुन बॅंकेमध्ये व बॅंकेच्या परीसरामध्ये सामाजीक अंतराचे (Social Distance) पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षीततेच्या उपाययोजनांचे माहिती फलक लावावेत. 
या आदेशाद्वारे विहित करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती भारतीय दंड संहिता (1860 चा 45) यांच्या कलम 188 अन्वये शिक्षा पात्र असलेल्या अपराध केला आहे असे मानन्यात येईल.  जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****



जिल्ह्यातील ऑप्टीकल्स शॉप दररोज सुरु राहणार


जिल्ह्यातील ऑप्टीकल्स शॉप दररोज सुरु राहणार

हिंगोली,दि.18: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक निर्माण होऊ शकतो. यामुळे  फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सुरक्षततेच्या सर्व उपाय योजनांचे पालन करुन जिल्ह्यातील ऑप्टीकल शॉप दररोज सकाळी 8.00 ते 1.00 या वेळेत सुरु ठेवण्यास काही अटी व शर्तींच्या अधिन राहून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी  परवानगी दिली आहे.
 सदरील उद्योग सुरु करते वेळेस काही अटी व शर्तीचे पालन करने बंधनकारक असुन यामध्ये संबंधितांनी दुकानाची सुरुवात करतांना संपुर्ण जागेचे सॅनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. दुकानातील कामगार/खरेदीदार यांची नोंद ठेवणे गरजेचे आहे जसे की, नाव, संपर्काचा पत्ता व मोबाईल क्रमांक. तसेच दुकानदारानी व त्यांच्या सोबत काम करणा-या कामगारांनी नेहमीच नाक व तोंड मास्कने पुर्णपणे झाकुन ठेवणे बंधनकारक आहे. खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांमध्ये एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता संबंधीत विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच सॅनिटायझर्स उपलब्ध ठेवण्यात यावेत. तसेच खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी दुकानासमोर एक मिटरचे अंतरांनी गोल/चौकोन आखावेत. दररोज कामावर येणा-या कामगारांची तपासणी थर्मल गन च्या सहाय्याने करण्यात यावी. दुकानदारांनी कामगारांसाठी मास्क व सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात यावेत. दुकानाच्या परिसरामध्ये कामगारांसाठी पिण्याच्या, हात धुण्याच्या पाण्याची व साबण याची व्यवस्था करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन उद्योग धंद्याच्या ठिकाणी व परीसरामध्ये सामाजीक अंतराचे पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षततेच्या उपाय योजनांची माहिती फलक लावण्यात यावेत.
आदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. तसेच आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.     
*****

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सिमा 31 मे पर्यंत राहणार बंद


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सिमा 31 मे पर्यंत राहणार बंद

हिंगोली,दि.18:  राज्‍य शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजीपासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील नागरीक बाहेर जिल्ह्यात प्रवास करीत आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यातील नागरीक ही हिंगोली जिल्ह्यात येत आहेत. बाहेर जिल्ह्यातून येणारे नागरीक, प्रवासी यांचेमार्फत करोना विषाणुंचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टिने तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना (कोवीड-19) नियंत्रणात आणण्यासाठी व त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे तसेच नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा जिल्ह्यात संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्याकरीता जिल्हा सिमा बंदीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सिमा दि. 31 मे, 2020 पर्यंत बंद करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही नागरीकास अत्यावश्यक कारण वगळता बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरीक नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस जिल्ह्यात अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे-मुंबई व इतर महानगरातुन जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना वैद्यकिय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
वरील आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी / कर्मचारी व अत्यावश्यक सेवा यांचेसाठी लागु राहणार नाहीत. सदरील आदेश दि. 18 मे, 2020 रोजी सकाळी 06.00 वा. पासून ते 31 मे 2020 चे 24.00 वाजे पर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था, अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये आणि भारतीय दंडसंहिता 1860 मधील कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

****

जिल्ह्यातील हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, ऑटोमोबाईल्स, मोबाईल शॉपी व स्टेशनरी दुकाने दररोज सुरु राहणार


जिल्ह्यातील हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, ऑटोमोबाईल्स,
मोबाईल शॉपी व स्टेशनरी दुकाने दररोज सुरु राहणार

हिंगोली,दि.18: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक निर्माण होऊ शकतो. यामुळे  फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सुरक्षततेच्या सर्व उपाय योजनांचे पालन करुन सर्व प्रकारचे हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स, मोबाईल शॉपी, इलेक्ट्रीकल व स्टेशनरी साहित्याचे दुकाने दररोज सकाळी 8.00 ते 1.00 या वेळेत सुरु ठेवण्यास काही अटी व शर्तींच्या अधिन राहून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी  परवानगी दिली आहे.
 सदरील उद्योग सुरु करते वेळेस काही अटी व शर्तीचे पालन करने बंधनकारक असुन यामध्ये संबंधितांनी दुकानाची सुरुवात करतांना संपुर्ण जागेचे सॅनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. दुकानातील कामगार/खरेदीदार यांची नोंद ठेवणे गरजेचे आहे जसे की, नाव, संपर्काचा पत्ता व मोबाईल क्रमांक. तसेच दुकानदारानी व त्यांच्या सोबत काम करणा-या कामगारांनी नेहमीच नाक व तोंड मास्कने पुर्णपणे झाकुन ठेवणे बंधनकारक आहे. खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांमध्ये एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता संबंधीत विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच सॅनिटायझर्स उपलब्ध ठेवण्यात यावेत. तसेच खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी दुकानासमोर एक मिटरचे अंतरांनी गोल/चौकोन आखावेत. दररोज कामावर येणा-या कामगारांची तपासणी थर्मल गन च्या सहाय्याने करण्यात यावी. दुकानदारांनी कामगारांसाठी मास्क व सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात यावेत. दुकानाच्या परिसरामध्ये कामगारांसाठी पिण्याच्या, हात धुण्याच्या पाण्याची व साबण याची व्यवस्था करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन उद्योग धंद्याच्या ठिकाणी व परीसरामध्ये सामाजीक अंतराचे पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षततेच्या उपाय योजनांची माहिती फलक लावण्यात यावेत.
आदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. तसेच आदेशाचे पालन न करणा-या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.     
****

जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दूकाने दररोज सुरु राहणार


जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दूकाने दररोज सुरु राहणार

हिंगोली,दि.18: जागतिक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला आहे. कोरानाग्रस्त रुग्‍णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमाचे आयोजन केल्‍यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता सर्वसामान्‍य जनतेस व त्‍यांचे आरोग्‍यास धोकादायक होत आहे. यामुळे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3)  अन्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.  
सद्यपरिस्थीती विचारात घेता किराणा माल विक्री दुकाने, भाजीपाला विक्री करणारे दुकाने, दुध विक्री केंद्र, परवाना असलेले चिकन / मटन शॉप, बेकरी, स्वीट मार्ट संबंधीत दुकाने दररोज प्रतिदिन सकाळी 8.00 ते 1.00 या वेळेतच सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सदरील उद्योग सुरु करते वेळेस काही अटी व शर्तीचे पालन करने बंधनकारक असून यामध्ये संबंधितांनी दुकानाची सुरुवात करतांना संपुर्ण जागेचे सॅनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. दुकानातील कामगार/खरेदीदार यांची नोंद ठेवणे गरजेचे आहे जसे की, नाव, संपर्काचा पत्ता व मोबाईल क्रमांक. तसेच दुकानदारानी व त्यांच्या सोबत काम करणा-या कामगारांनी नेहमीच नाक व तोंड मास्कने पुर्णपणे झाकुन ठेवणे बंधनकारक आहे. खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांमध्ये एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता संबंधीत विक्रेत्यांनी घ्यावी. तसेच सॅनिटायझर्स उपलब्ध ठेवण्यात यावेत. तसेच खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी दुकानासमोर एक मिटरचे अंतरांनी गोल/चौकोन आखावेत. दररोज कामावर येणा-या कामगारांची तपासणी थर्मल गन च्या सहाय्याने करण्यात यावी. दुकानदारांनी कामगारासाठी मास्क व सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात यावेत. दुकानाच्या परिसरामध्ये कामगारासाठी पिण्याच्या व हात धुण्याच्या पाण्याची व साबण याची व्यवस्था करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन उद्योग धंद्याच्या ठिकाणी व परीसरामध्ये सामाजीक अंतराचे पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षततेच्या उपाय योजनांची माहिती फलक लावण्यात यावेत.
त्या नुसार सामान खरेदीसाठी नागरिकांना पायी जावे लागणार आहे. त्यांना दूचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांचा वापर करता येणार नाही. नागरीकांची वाहने रस्त्यावर येऊ नये याकरीता आवश्यक त्या ठिकाणी बॅरीकेटींगचा वापर करावा.
 आदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. तसेच आदेशाचे पालन न करणा-या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. संबंधित आयोजक तसेच आस्‍थापना मालक/चालक/व्‍यवस्‍थापक यांना प्रत्‍येकास आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, उप विभागीय दंडाधिकारी, तालूका कार्यकारी दंडाधिकारी, पोलीस स्टेशन, सर्व जि. हिंगोली यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.     

****