31 October, 2022

 


जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन

         हिंगोली, (जिमाका) दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी  राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकात्मतेची शपथ देण्यात आली.  

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी,   जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

****

 

 




राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकता दौड’ संपन्न

 

            हिंगोली, दि.31: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सामान्य प्रशासन यांच्या वतीने मानवी साखळी तयार करुन एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. ही एकता दौड संत नामदेव कवायत मैदान-इंदिरा गांधी चौक- गांधी चौक-खुराणा पेट्रोलपंप,-जुनी नगरपालिका- मार्गे संत नामदेव कवायत मैदान येथे संपन्न झाली. या एकता दौडला जिल्हाधिकारी जिंतेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून एकता दौडचा शुभारंभ केला.  

            यावेळी जिल्हाधिकारी जिंतेंद्र पापळकर यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.  या एकता दौड मध्ये पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, नागरिक, खेळाडु, स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळे आदी सहभागी झाले होते.

            यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीन देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे, क्रीडा अधिकारी संजय बेतेवार, नानकसिंग बस्सी, शारीरिक शिक्षक संघाचे रमेश गंगावणे, योग विद्यालयाचे रत्नाकर महाजन आदींची उपस्थिती होती.

*****

 

 

28 October, 2022

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून

परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

 

        हिंगोली (जिमाका), दि. 28 :  महाराष्ट्र   लोकसेवा आयोगाकडून 2023 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे  आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी कळविले आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

            शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. तरी संबंधित संस्थांनी  परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याची विनंती  संस्थांना आयोगाने केल्याचेही त्यांनी कळविले आहे.

*****

 

 

 

 

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मानवी साखळी तयार करुन एकता दौडचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 :  सरदार वल्लभभाई पटेल यांचा दि. 31 ऑक्टोबर हा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्त केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी जिल्हास्तरावर राष्ट्रीय एकता दौड (UNITY RUN) चे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येते.

येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सामान्य प्रशासन यांच्या वतीने दि. 31 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता मानवी साखळी तयार करुन संत नामदेव कवायत मैदान-इंदिरा गांधी चौक- गांधी चौक-खुराणा पेट्रोलपंप,-जुनी नगरपालिका- संत नामदेव कवायत मैदानापर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडची सुरुवात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात येणार आहे.

या दौडमध्ये लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार,  जिल्हाधिकारी, समन्वयक नेहरु युवा केंद्र व शिक्षण विभाग, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, विद्यापीठ, शासकीय, निम शासकीय कार्यालय, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, शहरातील नागरिक, खेळाडू, इत्यादींचा सहभाग असणार आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी दि. 31 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता संत नामदेव कवायत मैदान येथे उपस्थित राहून एकता दोडमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे यांनी केले आहे.

*****

 

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागेशवाडी येथील

बाधित शेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी साधला संवाद



 

हिंगोली (जिमाका), दि. 28 :  कृषिमंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी परभणी वरून हिंगोलीला जात असतांना औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथील साळुबाई माणिकराव नाईक यांच्या शेताच्या बांधावर जाऊन परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी तहसीलदारांना नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी साळूबाई माणिकराव नाईक व त्यांचा मुलगा संजय नाईक यांच्यासोबत सहानुभूतीपूर्वक संवाद साधला. तसेच भाऊबीज निमित्त एक भाऊ म्हणून पाच हजार रुपये पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. तसेच साळूबाई नाईक यांना घरकुल व निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

        यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, तहसीलदार कृष्णा कानगुले, तालुका कृषि अधिकारी बबन वाघ, सरपंच प्रकाश घटोले आदींची उपस्थिती होती.

****

 







जिल्हा वार्षिक योजनेचा प्राप्त निधी वेळेत खर्च करावा

                                                        - पालकमंत्री अब्दुल सत्तार

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 :  प्रस्तावित कामे व नवीन कामाचे प्रस्ताव अडचणीचे निराकरण करुन तातडीने सादर करावेत. मागणीनुसार आपणास निधी उपलब्ध करुन दिला जाईल. जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2022-23 या वर्षासाठी प्राप्त झालेला निधी योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील विकास कामांवर वेळेत खर्च करावा, अशी सूचना राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

आज जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे कृषि मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, डॉ. प्रज्ञा सातव, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सन 2022-23 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण साठी 200 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 51 कोटी 50 लाख व आदिवासी उपयोजनेसाठी 18 कोटी 71 लाख 71 हजार असे एकूण 270 कोटी 21 लाख 71 हजार रुपयाचा नियतव्यय मंजूर आहे. यापूर्वी 24 जून, 2022 रोजीच्या जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेल्या 42 कोटी 71 लाख रुपयाची कामे रद्द करुन नव्याने मान्यता घेण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. तसेच या मंजूर नियतव्ययाचे योग्य नियोजन करुन सन 2022-23 चा निधी मार्चच्या अगोदर खर्च करावा. यामध्ये शासनाच्या सर्व योजनांची कामे वेळेत पार पाडावीत. एक काम दोन योजनेत येणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व यंत्रणांनी वाढलेले दर गृहीत धरुन प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. जिल्ह्याच्या विकासात सर्व यंत्रणांचा खारीचा वाटा आहे. आपल्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यात नाविण्यपूर्ण कामे करावीत. येत्या मार्च महिन्यात मा.उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन 200 कोटीवरुन 250 कोटीपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

            यावेळी वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने तेथील परिस्थितीचा अभ्यास करुन त्याठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी 10 लक्ष रुपयाचा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच रब्बी पिकांसाठी पिक कर्जाचे जास्तीत जास्त वितरण करावे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन सर्व बँकांना निर्देश द्यावेत. महावितरण विभागाने यंदा पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध  असल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा वापर करण्यासाठी नवीन डीपी बसवून द्यावेत. त्यांना वीजपुरवठा करताना कोणत्याही अडचणी येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

जिल्ह्यातील सर्व निजामकालीन शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असून त्याचे नुतनीकरण करण्यासाठी राज्याकडून 90 टक्के निधी देण्यात येणार आहे. उर्वरित 10 टक्के लोकवाटा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी देऊन शाळा दुरुस्ती करावी. जिल्हा परिषद शाळेतून चांगला विद्यार्थी घडावा यासाठी शिक्षण विभागांनी तसे नियोजन तयार करावे.

राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेला विषाणूजन्य लम्पी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी एक कोटी रुपयांचे पुनर्विनियोजन करण्यात आले असून या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून लम्पी आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात लस, औषधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावेत. जनावरांना सकस खाद्य देण्यासाठी प्रोटीनयुक्त गवताची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे.  तसेच जनावरांचा मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

वन विभागाने वन प्राण्यांनी केलेल्या पीक नुकसानीची पाहणी करुन पीक नुकसानग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करुन द्यावी. तसेच वन प्राण्यापासून पिंकाचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाचा डोंगराळ भागाशेजारी चर खोदून पिकांचे नुकसान थांबवावे. तसेच वनजमीन सुरक्षित करावी. यासाठी लागणारा निधी रोहयोतून खर्च करावा. एक दिवस बळीराजासाठी या अभियांनातर्गत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करुन त्यांच्या समस्याचे निराकरण करावे, असे निर्देशही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

            जिल्ह्यातील पोलीसांना नवीन वाहने उपलब्ध करुन द्यावीत. त्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. तसेच पोलीसांचे निवासस्थान अत्यंत खराब झाले असून त्यांच्या  निवासस्थानाचे काम करण्यासाठी पोलीस हाऊसींग बोर्डाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिक्षण, क्रीडा, कृषी, पशुसंवर्धन, रब्बी पिक कर्ज वाटप, क्रीडा विभाग, ग्रंथालय, कौशल्य विकास, आरोग्य , महिला व बालकल्याण, गृह आदी विभागाचा सविस्तर आढावा घेतला.  

यावेळी आमदार सर्वश्री. तान्हाजी मुटकुळे, राजू नवघरे, डॉ. प्रज्ञा सातव यांनी मांडलेल्या विविध विषयांवर योग्य नियोजन करुन जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीनंतर एकता सप्ताहानिमित्त उभारण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांच्यासह सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.         

****

27 October, 2022

 

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता दौडचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 :  सरदार वल्लभभाई पटेल यांचा दि. 31 ऑक्टोबर हा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्त केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी जिल्हास्तरावर राष्ट्रीय एकता दौड (UNITY RUN) चे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येते.

येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सामान्य प्रशासन यांच्या वतीने दि. 31 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता अग्रेसन चौक-इंदिरा गांधी चौक- गांधी चौकापर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात येणार आहे.

या दौडमध्ये लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार,  जिल्हाधिकारी, समन्वयक नेहरु युवा केंद्र व शिक्षण विभाग, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, विद्यापीठ, शासकीय, निम शासकीय कार्यालय, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, शहरातील नागरिक, खेळाडू, इत्यादींचा सहभाग असणार आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी दि. 31 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता अग्रेसन चौक येथे उपस्थित राहून एकता दोडमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे यांनी केले आहे.

*****

 

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा

सुधारित हिंगोली जिल्हा दौरा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 :  राज्याचे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री संजय राठोड हे दि. 28 ऑक्टोबर, 2022 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 28 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता निवासस्थान यवतमाळ येथून शासकीय वाहनाने कळमनुरी जि.हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह कळमनुरी येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वाजता श्री रामचंद्र सात महाराज मंदिर (लमानदेव) कळमनुरीकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता  श्री रामचंद्र सात महाराज मंदिर (लमानदेव) येथील आयोजित भाऊबीज कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता वसंतनगर ता. दिग्रस  जि. यवतमाळकडे प्रयाण.  

*****

 

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा

हिंगोली जिल्हा दौरा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 :  राज्याचे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री संजय राठोड हे दि. 28 ऑक्टोबर, 2022 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 28 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता बोथ (तांडा), ता.किनवट जि. नांदेड येथून शासकीय वाहनाने कळमनुरी जि.हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 11.20 वाजता शासकीय विश्रामगृह कळमनुरी येथे आगमन व राखीव. सकाळी 11.25 वाजता श्री रामचंद्र सात महाराज मंदिर (लमानदेव) कळमनुरीकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता  श्री रामचंद्र सात महाराज मंदिर (लमानदेव) येथील आयोजित भाऊबीज कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता वसंतनगर ता. दिग्रस  जि. यवतमाळकडे प्रयाण.  

*****

 

कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांचा हिंगोली जिल्हा दौरा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : राज्याचे कृषीमंत्री मा.ना.श्री.अब्दुल सत्तार  हे दि. 27 व 28 ऑक्टोबर, 2022 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 27 ऑक्टोबर, 2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन, राखीव व मुक्काम.

शुक्रवार दिनांक 28 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक.(स्थळ:जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली). सकाळी 10.50 वाजता कळमनुरीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे व खासदार मा. श्रीकांत शिंदे यांच्या समवेत भाऊबीज कार्यक्रमास उपस्थिती. ( स्थळ: श्री रामचंद्र सातमहाराज मंदिर(लमानदेव) कळमनुरी ता. कळमनुरी जी.हिंगोली). दुपारी 12.00 वाजता कळमनुरी येथून नांदेडकडे प्रयाण.

*****

20 October, 2022

 

चला जाणूया नदीला या अभियानाची अंमलबजावणी व नियोजन करण्यासाठी विभागीय अधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

 

 



हिंगोली (जिमाका), दि. 20  :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला या अभियानाची अमलबजावणी करण्यासाठी व नियोजन करण्यासाठी आज दि. 20 ऑक्टोबर,2022 रोजी विभागीय वन अधिकारी हिंगोली येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस विभागीय वन अधिकारी बाळासाहेब कोळगे, उपविभागीय जलसंपदा अधिकारी खिराडे व उगम संस्थेचे संस्थापक जयाची पाईकराव व दिशांत पाईकराव तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कुंडलीक होरे, राहुल शेळके व वन कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.

या बैठकीमध्ये दहा दिवसाच्या दिंडीचे नियोजन करण्यात आले. दिंडीची सुरुवात आगरवाडी येथून होणार असून समारोप कळमनुरी तालुक्यातील चिखली येथे होणार आहे. या अभियानाचा कालावधी दि.2 ऑक्टोंबर,2022 ते 26 जानेवारी, 2022 असा असणार आहे. अभियानामध्ये महाराष्ट्रातील 75 नद्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यापैकी हिंगोली जिल्ह्यातुन वाहणारी कयाधू व आसना नदीची निवड करण्यात आली आहे. कयाधू नदी ही हिंगोली जिल्ह्यातून 100 कि.मी वाहते.

या अभियानाचा मुख्य उदेश हाच आहे की, पूर्वीच्या काळी ही नदी मार्च एप्रिल महिन्यापर्यंत वाहत होती परंतु आज रोजी ही नदी नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत वाहते. त्यामुळे नदीचे होत असलेले प्रदुषण थांबवण्यासाठी जनजागृती करुन नदीचे पूर्वीचे स्वरुप नदीला परत प्राप्त करुन देण्यासाठी या अभियानाची सुरुवात झाली आहे,असे चला जाणूया नदीला या अभियान समितीचे सदस्य सचिव तथा विभागीय वन अधिकारी बाळासाहेब कोळगे यांनी सांगितले आहे.

*****

 

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत

ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली अंतर्गत दि. 31 ऑक्टोबर, 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून गुगल मीटवर मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये व्ही. बी. जगताप, जिल्हा व्यवस्थापक, हिंगोली हे मार्गदर्शन करणार आहेत.

या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यासाठी https://meet.google.com/ouv-imog-bxo या ऑनलाईन लिंकवर (meeting URL)  क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट ॲप (google meet app)  यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर इन्स्टॉल करुन घ्यावे. आपण गुगल मीट ॲप (google meet app)  मधून कनेक्ट झाल्यानंतर आस्क टू जॉइन (Ask to join) वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे अगोदर जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद (Mute) करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु (unmute) करुन विचारावे व लगेच माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारताना मोजक्या शब्दात विचारावेत. या सर्व सूचनांचे पालन करुन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी व्हावेत.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील उमेदवारांनी ऑनलाईन मोफत मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त , जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

*****

 

नेहरु युवा केंद्राच्या वतीने लिंगदरी येथे मेगा स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत

स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न

 


हिंगोली (जिमाका), दि. 20 :  येथील नेहरु युवा केंद्र व युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार  यांच्या वतीने स्वच्छ भारत  अभियान 2.0 चा कार्यक्रम पूर्ण भारतात 02 आक्टोंबर 2022 ते 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत चालू आहे. त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील लिंगदरी या गावी  मेगा स्वच्छ भारत अभियान 2.0 कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी गावातील सर्व गाव  परिसर स्वच्छ करण्यात आला. गावातील प्लास्टिक कचरा एकत्र जमा करुन  त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच नेहरु युवा केंद्राच्या युवा कर्मिने गावात स्वच्छतेची शपथ दिली व गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले.

प्रत्येकाने आपला गाव, आपला परिसर, आपले घर कसे स्वच्छ ठेवले पाहिजे आणि ते ठेवल्याने आपण होणाऱ्या रोगराईपासून कसे दूर राहील हे व राष्ट्रपिता महात्मा गांधीजीने पाहिलेलं स्वप्न आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करुया याविषयी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक प्रवीण पांडे, नामदेव फरकांडे, गजानन आडे, संदिप शिंदे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला  विद्यार्थी, गावातील युवा, युवती , सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक आदीची उपस्थिती होती.

*****

 

भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दि. 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

 दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त  दि. 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे, असे पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

*****

 

खाजगी प्रवासी बस धारकांकडून जास्तीचे भाडे आकारल्यास

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ई-मेलवर तक्रार दाखल करावी

- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी

हिंगोली (जिमाका), दि. 20 : आगामी सणासुदीच्या काळामध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे खाजगी प्रवासी बस धारकांकडून मनमानी भाढेवाढ करण्यात येते. वास्तविक खाजगी प्रवासी बसेसने एसटी महामंडळाने विशिष्ट बस संवर्गासाठी विहित केलेल्या भाड्याच्या दिड पट पेक्षा अधिक आकारु नये , असे निर्देश परिवहन आयुक्तांनी वेळोवेळी दिलेले आहेत. याबाबत शासनाने 27 ऑक्टोबर, 2021 रोजी शासन निर्णय जारी करुन कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. त्यानुसार कंत्राटी बसेसचे प्रती आसन कमाल भाडेदर पुढीलप्रमाणे आहे.

44 प्रवासी क्षमता असलेल्या साधी बस (3x2) साठी हिंगोली येथून मुंबईसाठी 1320 रुपये, पुणे-1006, कोल्हापूर-1241, नागपूर-719, इंदौर (वाशिम मार्गे)-1006, सुरत (औरंगाबाद मार्गे)-1346, औरंगाबाद-510, हैद्राबाद-837,सोलापूर-902, अमरावती-380, अकोला-276, हिंगोली ते वाशिम-106, हिंगोली ते परभणी-171, हिंगोली ते नांदेड-197 रुपये प्रवासी भाडे आहे.

  39 प्रवासी क्षमता असलेल्या वातानुकुलीत सिटसाठी हिंगोली येथून मुंबईसाठी 1875 रुपये, पुणे-1423, कोल्हापूर-1763, नागपूर-1022, इंदौर (वाशिम मार्गे)-1422, सुरत (औरंगाबाद मार्गे)-1912, औरंगाबाद-726, हैद्राबाद-1189,सोलापूर-1282, अमरावती-1541, अकोला-393, हिंगोली ते वाशिम-152, हिंगोली ते परभणी-244, हिंगोली ते नांदेड-281 रुपये प्रवासी भाडे आहे.

  44 प्रवासी क्षमता असलेल्या नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी हिंगोली येथून मुंबईसाठी 1800 रुपये, पुणे-1373, कोल्हापूर-1686, नागपूर-974, इंदौर (वाशिम मार्गे)-1373, सुरत (औरंगाबाद मार्गे)-1835, औरंगाबाद-697, हैद्राबाद-1142,सोलापूर-1248, अमरावती-520, अकोला-378, हिंगोली ते वाशिम-146, हिंगोली ते परभणी-235, हिंगोली ते नांदेड-271 रुपये प्रवासी भाडे आहे.

30 प्रवासी क्षमता असलेल्या एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी हिंगोली येथून मुंबईसाठी 2025 रुपये, पुणे-1544, कोल्हापूर-1917, नागपूर-1103, इंदौर (वाशिम मार्गे)-1544, सुरत (औरंगाबाद मार्गे)-2065, औरंगाबाद-783, हैद्राबाद-1284,सोलापूर-1384, अमरावती-583, अकोला-423, हिंगोली ते वाशिम-162, हिंगोली ते परभणी-262, हिंगोली ते नांदेड-302 रुपये प्रवासी भाडे आहे.

अधिकचे भाडे आकारल्यास आपण हिंगोली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या dyrto.38-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार दाखल करावी. तसेच वरील निश्चित केलेले भाडे दर विविध ठिकाणी खाजगी प्रवासी बसेस बुकींगच्या दर्शनी भागात , बसेसमध्ये , कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेले आहेत. शासन निर्णय दि. 27 ऑक्टोबर, 2021 नुसार खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे दर राज्य परिवहन महामंडळ यांच्या समक्ष संवर्गाच्या वाहनाच्या एकूण भाडे दराच्या दिड पट पेक्षा अधिक राहणार नाही .

या अनुषंगाने हिंगोली  जिल्ह्यातील सर्व जनतेनी प्रवास करतानां खाजगी बस वाहनधारकाकडून निश्चित केलेल्या वाहनदरापेक्षा जास्त भाडेदर आकारत असतील तर आपण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या dyrto.38-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार दाखल करावी, असे आवाहन अनंता जोशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

19 October, 2022

 

पात्र दिव्यांगानी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी

20 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी शासनाने विविध योजनांचे आयोजन केले असून त्याचा लाभ जिल्ह्यातील दिव्यांगाना मिळावा यासाठी पंचायत समिती मार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.

ही योजना दिव्यांग विवाहित जोडप्यासाठी असून विवाहित जोडप्यांचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये दिव्यांग विवाहित जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या दिव्यांगाना त्यांच्या आजारावरील उपचारासाठी 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. दुर्धर आजारामध्ये कॅन्सर, क्षयरोग, हृदयशस्त्रक्रिया, मेंदूविकार इत्यादी आजारांचा समावेश आहे.

पात्र दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीमार्फत दि. 20 नोव्हेंबर, 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन आर. एच. एडके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.  

*****

 

तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राद्वारे विविध गावांमध्ये स्वच्छता अभियान

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : संत नामदेव सेवाभावी संस्था, संचलित भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली संलग्न कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर ता. कळमनुरी जि. हिंगोली अंतर्गत 'स्वच्छता अभियान 2.0' तसेच प्रलंबित कार्य पूर्ण करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.  या मोहिमेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व सेनगाव तालुक्यातील वांजोळा, तोंडापूर, कोंढुर, सिंदगी, कुर्तडी , भवानी मंदिर, येडशी, भोसी, भुवनेश्वर, जिल्हा परिषद हायस्कुल कुर्तडी व कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरामध्ये विविध उपक्रमाद्वारे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध गावांमध्ये स्वच्छता व स्वच्छता शपथ गावकऱ्यांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोहि  पूर्ण करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे  गाव आणि शहरे स्वच्छ राहतील आणि रोगांचा प्रसार होणार नाही. त्याचबरोबर माणसाची जीवनशैली सुद्धा बदलून जाईल.

या कार्यक्रमाची सुरुवात माजी खासदार शिवाजीराव माने यांनी  2 ऑक्टोबरला कृषी विज्ञान केंद्रात भेट देवून केली असून हा उपक्रम कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

या उपक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. राजेश भालेराव, प्रा. अनिल ओळंबे, प्रा. अजयकुमार सुगावे, प्रा. रोहींनी शिंदे, डॉ. अतुल मुराई, डॉ. कैलाश गीते यांनी  विविध गावामध्ये जाऊन स्वच्छता मोहिमेचे कार्य करुन प्रसार व प्रचार करीत आहेत.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विजय ठाकरे, सौ. मुंगल, शिवलिंग लिंगे, ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, प्रेमदास जाधव, संतोष हानवते हे उत्तमरित्या मदत करत आहेत.

*****

 

सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळाला

राज्य शासनाचा उत्कृष्ट गणेश मंडळाचा सन्मान प्रदान

 




हिंगोली (जिमाका), दि. 19 : उत्कृष्ट गणेश मंडळाचा राज्य शासनाचा पुरस्कार सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळ एनटीसी हिंगोलीला मुबंई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. 

            मुबंई येथील रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे राज्य शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ पुरस्कार 2022 पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार दि. 18 ऑक्टोबर रोजी  सांस्कृतिक कार्य व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सांकृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, सांकृतिक विभागाच्या उपसचिव श्रीमती वाघमारे, पु.ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

            हिंगोली येथील एनटीसी भागातील सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळाला राज्य शासनाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सांस्कृतिक कार्ये व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र व धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कल्याण देशमुख, पदाधिकारी प्रा.नरेंद्र रायलवार, नागनाथ लोंखडे, संजय भुमरे यांची उपस्थिती होती.

बक्षीस वितरण सोहळ्यास राज्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व समिती सदस्य, सांस्कृतिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळाच्या सामाजिक बांधिलकीची दखल राज्यस्तरीय उत्कृष्ट गणेश मंडळ बक्षीस वितरण सोहळ्यात घेण्यात आली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांचे विशेष कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

*****

18 October, 2022

 

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी इमावच्या दोन जागा

निवड चाचणी परीक्षेसाठी 25 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 18 : जवाहर नवोदय विद्यालय, वसमतनगर, जि.हिंगोली येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी इयत्ता नववीच्या एकूण दोन जागासाठी निवड चाचणी परीक्षा ही शनिवार, दि. 11 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता घेण्यात येणार आहे. या जागा ग्रामीण भागातील इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (OBC) आहेत.

            या परिक्षेस जे विद्यार्थी  हिंगोली जिल्ह्यांतर्गत शैक्षणिक वर्ष-2022-23 मध्ये इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेले पाहिजेत. त्यानांच या निवड परिक्षेस बसण्याची संधी मिळेल.

            या परिक्षेसाठी जवाहर नवोदय विद्यालय समिती, मुख्य कार्यालय, नोएडा यांच्या www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर दि. 25 ऑक्टोबर, 2022 पर्यंत आवेदनपत्र भरता येतील.

            अधिक माहितीसाठी एस.एस.वाघमारे, प्राचार्य (मो.9511676209), व्ही. व्ही. गर्जे, टीजीटी मराठी (मो.9518962241), श्री. श्रीनिवास, कार्यालयीन अधीक्षक (मो.9182293280), राजू जोंधळे, लिपिक (मो.9921358358, 7020275149) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एस.एस.वाघमारे, प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, वसमतनगर, जि.हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.   

*****

 

ज्ञानसंपन्न समृध्द समाज घडविण्यासाठी ग्रंथालयांचा विकास होणे आवश्यक

- प्रा. जगदीश कदम




 

            हिंगोली (जिमाका), दि. 18 : ज्ञान संपन्न समृध्द समाज घडविण्यासाठी ग्रंथालयाचा विकास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जगदीश कदम यांनी केले.

डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचा जन्मदिन 15ऑक्टोंबर हा दिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. त्यानिमित्त येथील जिल्हा ग्रंथालयात दि. 15 ते 18 ऑक्टोंबर, 2022 या कालावधीत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते. आज या ग्रंथ ग्रंथप्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात जेष्ठ साहित्यिक प्रा.जगदीश कदम बोलत होते. यावेळी प्रा. अशोक अर्धापुरकर , प्राचार्य नागनाथ पाटील, कवी  श्रीनिवास मस्के, कवी शिवाजी कऱ्हाळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आ.अ. ढोक, संगत प्रकाशन नांदेडचे प्रकाशक संजय सुरनर उपस्थित होते.

यावेळी वाचन संस्कृती व ग्रंथालयांचे महत्व विषद केले. तसेच मान्यवर कवी यांनी  साहित्याचे /वाचनाचे महत्व, सामाजिक विषयावर, कृषी, देशभक्तीपर कविता सादर केल्या. तसेच वाचनाचे व वाचनालयाचे महत्व सांगितले.

*****