28 October, 2022

 

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मानवी साखळी तयार करुन एकता दौडचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 :  सरदार वल्लभभाई पटेल यांचा दि. 31 ऑक्टोबर हा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्त केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी जिल्हास्तरावर राष्ट्रीय एकता दौड (UNITY RUN) चे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येते.

येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सामान्य प्रशासन यांच्या वतीने दि. 31 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता मानवी साखळी तयार करुन संत नामदेव कवायत मैदान-इंदिरा गांधी चौक- गांधी चौक-खुराणा पेट्रोलपंप,-जुनी नगरपालिका- संत नामदेव कवायत मैदानापर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडची सुरुवात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात येणार आहे.

या दौडमध्ये लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार,  जिल्हाधिकारी, समन्वयक नेहरु युवा केंद्र व शिक्षण विभाग, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, विद्यापीठ, शासकीय, निम शासकीय कार्यालय, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, शहरातील नागरिक, खेळाडू, इत्यादींचा सहभाग असणार आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी दि. 31 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता संत नामदेव कवायत मैदान येथे उपस्थित राहून एकता दोडमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे यांनी केले आहे.

*****

No comments: