सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळाला
राज्य शासनाचा उत्कृष्ट गणेश मंडळाचा सन्मान प्रदान
हिंगोली
(जिमाका), दि. 19 : उत्कृष्ट गणेश मंडळाचा राज्य शासनाचा पुरस्कार सिद्धिविनायक
सार्वजनिक गणेश मंडळ एनटीसी हिंगोलीला मुबंई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान
करण्यात आला.
मुबंई येथील रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे राज्य शासनाच्या
उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ पुरस्कार 2022 पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार दि. 18
ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्य व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते
संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सांकृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय,
सांकृतिक विभागाच्या उपसचिव श्रीमती वाघमारे, पु.ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प
संचालक संतोष रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिंगोली
येथील एनटीसी भागातील सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळाला राज्य शासनाचा
जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सांस्कृतिक कार्ये व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार
यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र व धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी
मंडळाचे अध्यक्ष कल्याण देशमुख, पदाधिकारी प्रा.नरेंद्र रायलवार, नागनाथ लोंखडे,
संजय भुमरे यांची उपस्थिती होती.
बक्षीस वितरण सोहळ्यास राज्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व समिती
सदस्य, सांस्कृतिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळाच्या सामाजिक बांधिलकीची दखल राज्यस्तरीय
उत्कृष्ट गणेश मंडळ बक्षीस वितरण सोहळ्यात घेण्यात आली. मंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांचे विशेष कौतुक करुन
शुभेच्छा दिल्या.
*****
No comments:
Post a Comment