पात्र दिव्यांगानी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी
20 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली
(जिमाका), दि. 19 : जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी शासनाने विविध योजनांचे आयोजन केले
असून त्याचा लाभ जिल्ह्यातील दिव्यांगाना मिळावा यासाठी पंचायत समिती मार्फत अर्ज
मागविण्यात येत आहेत.
ही योजना दिव्यांग विवाहित जोडप्यासाठी असून विवाहित जोडप्यांचे
विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये दिव्यांग
विवाहित जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे
जिल्ह्यातील दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या दिव्यांगाना त्यांच्या आजारावरील
उपचारासाठी 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. दुर्धर आजारामध्ये कॅन्सर,
क्षयरोग, हृदयशस्त्रक्रिया, मेंदूविकार इत्यादी आजारांचा समावेश आहे.
पात्र दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीमार्फत
दि. 20 नोव्हेंबर, 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन आर. एच. एडके, जिल्हा
समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment