20 October, 2022

 

चला जाणूया नदीला या अभियानाची अंमलबजावणी व नियोजन करण्यासाठी विभागीय अधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

 

 



हिंगोली (जिमाका), दि. 20  :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला या अभियानाची अमलबजावणी करण्यासाठी व नियोजन करण्यासाठी आज दि. 20 ऑक्टोबर,2022 रोजी विभागीय वन अधिकारी हिंगोली येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस विभागीय वन अधिकारी बाळासाहेब कोळगे, उपविभागीय जलसंपदा अधिकारी खिराडे व उगम संस्थेचे संस्थापक जयाची पाईकराव व दिशांत पाईकराव तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कुंडलीक होरे, राहुल शेळके व वन कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.

या बैठकीमध्ये दहा दिवसाच्या दिंडीचे नियोजन करण्यात आले. दिंडीची सुरुवात आगरवाडी येथून होणार असून समारोप कळमनुरी तालुक्यातील चिखली येथे होणार आहे. या अभियानाचा कालावधी दि.2 ऑक्टोंबर,2022 ते 26 जानेवारी, 2022 असा असणार आहे. अभियानामध्ये महाराष्ट्रातील 75 नद्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यापैकी हिंगोली जिल्ह्यातुन वाहणारी कयाधू व आसना नदीची निवड करण्यात आली आहे. कयाधू नदी ही हिंगोली जिल्ह्यातून 100 कि.मी वाहते.

या अभियानाचा मुख्य उदेश हाच आहे की, पूर्वीच्या काळी ही नदी मार्च एप्रिल महिन्यापर्यंत वाहत होती परंतु आज रोजी ही नदी नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत वाहते. त्यामुळे नदीचे होत असलेले प्रदुषण थांबवण्यासाठी जनजागृती करुन नदीचे पूर्वीचे स्वरुप नदीला परत प्राप्त करुन देण्यासाठी या अभियानाची सुरुवात झाली आहे,असे चला जाणूया नदीला या अभियान समितीचे सदस्य सचिव तथा विभागीय वन अधिकारी बाळासाहेब कोळगे यांनी सांगितले आहे.

*****

No comments: