कळमनुरी येथील अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत
बाल कायद्यांची जनजागृती कार्यक्रम संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 04 : सेवा पंधरवाडा
कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कळमनुरी येथील अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळेत जिल्हा महिला
व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या
मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बाल कायद्यांची जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण
कक्षातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड.
अनुराधा पंडित, समाजिक कार्यकर्त्या रेशमा पठाण यांनी बाल संरक्षणाच्या दृष्टीने असलेले
बालकांचे हक्क, ज्यामध्ये पोक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा-2006, बाल कामगार
प्रतिबंध कायदा, शिक्षण हक्क कायदा बाल कायदे व वैयक्तीक स्वच्छतेबाबत सादरीकरणाद्वारे
सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या
विविध यंत्रणांविषयी व चाईल्ड लाईन टोल फ्री क्र. 1098 व पोलीस हेल्पलाईन क्र. 112
याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमास शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक
एम. व्ही. कौठेकर, अधीक्षक व्ही.एस.इंगोले, शिक्षक ए.डी.अंभोरे, पी.एम.हजारे, जावळे,
धांडे, गिरी, गावंडे आदी उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment