5-औंरगाबाद विभाग
शिक्षक मतदार संघाची शंभर टक्के मतदार नोंदणी करावी
- डॉ.सचिन खल्लाळ
हिंगोली (जिमाका), दि. 04 : वसमत तालुक्यातील माध्यमिक वा
त्यापेक्षा उच्च स्तर असलेल्या शैक्षणिक संस्था यांचे मुख्याध्यापक / प्राचार्य
यांची मतदार नोंदणी बाबत प्राथमिक बैठक आज दि. 04 ऑक्टोबर, 2022 रोजी दुपारी 5.00
वाजता वसमत येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यांत आली होती. या बैठकीस
तहसीलदार अरविंद बोळंगे, गट शिक्षणाधिकारी तानाजी भोसले, नायब तहसीलदार निलेश
पळसकर, वसमत तालुक्यातील
43
मुख्याध्यापक व प्राचार्य
उपस्थित होते.
5-औंरगाबाद
विभाग शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी मा.विभागीय आयुक्त, औंरगाबाद
आहेत. दि. 27 सप्टेंबर, 2022 रोजी व्हीसीव्दारे शिक्षक मतदार संघाच्या
निवडणूक विषयक तरतुदी तसेच
मा.भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनेच्या अनुषंगाने
कार्यवाहीची अंमलबजावणी करुन शंभर टक्के मतदार नोंदणी करुन अचूक मतदार यादी तयार
करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
त्याअनुषंगाने
आज वसमत तालुक्यातील माध्यमिक वा त्यापेक्षा उच्च स्तर असलेल्या शैक्षणिक संस्था
यांचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांची मतदार नोंदणी बाबत प्राथमिक बैठक आयोजित
करण्यात आलेली होती. शिक्षक मतदार संघ मतदार नोंदणी साठी -ती व्यक्ती मतदार
संघासाठी भारताचा नागरिक असावी. तसेच ती व्यक्ती ज्याचा सर्वसाधारण रहिवास
शिक्षक मतदार संघात आहे. आणि 01 नोव्हेंबर, 2022 पूर्वी लगतच्या सहा वर्षापैकी
एकूण तीन वर्ष माध्यमिक स्तर किंवा त्यावरील शिक्षण संस्थेत अध्यापनाचे काम करीत
असल्यास मतदार यादीत नाव नोंदविण्यास पात्र आहे. मतदार म्हणून नांव नोंदविण्यासाठी
नमुना 19 मध्ये तपशील भरुन त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे साक्षांकित करुन दाखल
करणे आवश्यक आहे. जसे (आधार कार्ड व मतदार ओळखपत्राची प्रत- दोन्ही बाजूची) तसेच
व्यक्ती ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये कार्यरत आहे त्या शैक्षणिक संस्थेच्या
प्रमुखाने मागील सहा वर्षापैकी तीन वर्ष संस्थेत अध्यापनाचे काम करीत असल्याबाबतचे
विहित प्रमाणपत्र सही शिक्यानिशी सोबत देण्याबाबत विषद केले आहे. मतदार नोंदणी अंतिम
दि. 07 नोंव्हेबर, 2022 असा आहे. शिक्षक मतदार संघाची मतदार नोंदणीची ही प्रक्रिया
पूर्णत:
नव्याने करावी लागणार आहे. त्यामुळे वेळेची वाट न पाहता तात्काळ मतदार
नोंदणी पूर्ण करावी. त्याकरिता लागणारे फार्म तहसील कार्यालय वसमत, गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती कार्यालय वसमत येथून प्राप्त करुन संपूर्ण माहिती व आवश्यक त्या
कागदपत्रासह 07 नोव्हेंबर, 2022 पूर्वी निवडणूक विभाग तहसील कार्यालय वसमत येथे
दाखल करावे. तदनंतर मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी विचारलेल्या विविध शंकाचे
समाधान डॉ.सचिन खल्लाळ यांनी केले. तसेच शिक्षक मतदार संघातील निवडणूक विषयक तरतुदी
व नियमाचे सखोल मार्गदर्शन केले.
5-औंरगाबाद
विभाग शिक्षक मतदार संघाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी दि. 23 नोव्हेंबर, 2022
असून त्या अनुषंगाने दि. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर, 2022 दावे व हरकती स्वीकारले
जाणार आहेत. 25 डिसेंबर, 2022 रोजी दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार
करुन छपाई करण्यात येणार आहे. दि. 30 डिसेंबर, 2022 रोजी
मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे.
5-औंरगाबाद
विभाग शिक्षण मतदार संघ पदनिर्देशीत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ
यांनी
विविध बाबीची सविस्तर माहिती देऊन वसमत तालुक्यातील शिक्षक मतदार संघातील एकही
पात्र मतदार मतदार नोंदणी पासून वंचित राहू नये. जेणे करुन शंभर टक्के मतदार
नोंदणी
करावी, असे आवाहन बैठकीस उपस्थित सर्वाना करण्यात आले आहे.
******
No comments:
Post a Comment