प्रधान मंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम-2022
स्थानिक नैसर्गिक
आपत्ती अथवा काढणीपश्चात नुकसान या जोखिमेचा लाभ मिळण्यासाठी
विमा कंपनीकडे
इंटिंमेशन दाखल करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 12 : राज्यात खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक राबविण्यासाठी
क्लस्टरनिहाय विमा कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी
आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शूरन्स कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीची निवड करण्यात
आली आहे. खरीप हंगामातील खरीप ज्वारी , तूर, मूग, उडीद, कापूस व सोयाबीन या
पिकांना विमा संरक्षण उपलब्ध आहे.
चालू खरीप-2022 हंगामात अतिवृष्टी, पूर इत्यादी
कारणामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या जोखिमेसाठी विमा
संरक्षण उपलब्ध आहे. यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे इंटिमेशन (माहिती) देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.
यामध्ये पीएमएफबीआय पोर्टल, कंपनीचा टोल फ्री क्र. 18001037712, कंपनीचा ई-मेल
आयडी : customerspportba@icicilombard.com , केंद्र शासनाचे क्रॉप इन्शूरन्स ॲप व ऑफलाईन
पध्दतीद्वारे इंटिमेशन (माहिती) देता येते. इंटिमेशन (माहिती) देण्यासाठी कोणतेही
शुल्क आकारले जात नाही.
सध्याच्या स्थितीत सोयाबीन पीक कापणीसाठी तयार
असून काही ठिकाणी कापणी झालेले सोयाबीन शेतातच पडून आहे. सध्या चालू असलेल्या
पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती
अथवा काढणीपश्चात नुकसान या जोखिमेचा लाभ मिळण्यासाठी इंटिंमेशन (माहिती) दाखल
करणे ही अट अनिवार्य आहे.
त्यामुळे विम्याचा प्रिमियम भरलेल्या व पावसाने
नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्याबाबतचे दावे (इंटिमेशन) तात्काळ दाखल
करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी सर्व शेतकरी
बांधवाना केले आहे.
*******
No comments:
Post a Comment