01 October, 2022

 

प्रधान मंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम-2022

इंटिमेशन (माहिती) दिलेल्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करणार

- जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : राज्यात खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक राबविण्यासाठी क्लस्टरनिहाय विमा कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शूरन्स कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीची निवड करण्यात आली आहे. खरीप हंगामातील खरीप ज्वारी , तूर, मूग, उडीद, कापूस व सोयाबीन या पिकांना विमा संरक्षण उपलब्ध आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे इंटिमेशन (माहिती) देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये पीएमएफबीआय पोर्टल, कंपनीचा टोल फ्री क्र. 18001037712, कंपनीचा ई-मेल आयडी : customerspportba@icicilombard.com , केंद्र शासनाचे क्रॉप इन्शूरन्स ॲप व ऑफलाईन पध्दतीद्वारे इंटिमेशन (माहिती) देता येते. इंटिमेशन (माहिती) देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी दिलेले इंटिंमेशन (माहिती) विमा कंपनीकडून रिजेक्ट  केल्याचे निदर्शनास येत आहे. शेतकऱ्यांकडून याबाबत निवेदने प्राप्त होत आहेत. सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी याबाबत आढावा घेऊन शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या इंटिमेशन (माहिती) रिजेक्ट न करता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रमाणित करावयाचे सर्वेक्षण निर्धारित मुदतीत पूर्ण करावेत, अशा सूचना आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शूरन्स कंपनीस दिल्या आहेत. त्यानुसार इंटिमेशन (माहिती) देणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*******

No comments: