10 October, 2022

 

महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा, पंडित दीननयाळ उपाध्याय

रोजगार मेळाव्याचे 14 ऑक्टोबर रोजी आयोजन

·         रोजगार मेळाव्यात 656 रिक्तपदे भरण्यात येणार

·         रोजगार मेळाव्यास ऑनलाईन सहभागी होण्यासाठी संकेतस्थळाचा वापर करावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत नवोदित उद्योजकांच्या कल्पनांना पोषक वातावरण पुरवून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या स्टार्टअपची स्वप्ने साकार करण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे व पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, पठाडे कॉलेज जवळ, अकोला रोड, बळसोंड, हिंगोली येथे दि. 14 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात आलेले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये विमा प्रतिनिधी, ॲप्रेंटीस ट्रेनी, ट्रेनी ऑपरेटर, सेल्स एक्झ्यूकेटीव्ह, सुपरवायझर, सिव्हील इंजिनिअर, वाहनचालक, वॉचमॅन, ऑफिस बॉय, शॉपकिपर, ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, बॉयलर आटेंडन्ट इत्यादी पदासाठी मागणी प्राप्त झालेली असून 656 रिक्तपदे भरण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन या रोजगार मेळाव्यास उमेदवारांना ऑनलाईन सहभागी होण्यासाठी www.rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळाचे होमपेज उघडावे. आपल्या सेवायोजन कार्डावरील रजिस्ट्रेशन क्रमांक आणि प्राप्त झालेल्या पासवर्डने लॉग इन करावे. District मध्ये हिंगोली जिल्हा निवडून फिल्टर बटनवर क्लिक करावे. त्यानंतर PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR-4-HINGOLI दि. 14 ऑक्टोबर, 2022 हा मेळावा निदर्शनास येईल. त्यासमोर असलेल्या ॲक्शन बटनाच्या खाली View व Apply बटन दिसेल. त्यापैकी ॲप्लाय बटनवर क्लिक केल्यावर टर्मस् ॲन्ड कंडिशन बाबत पेज येईल. तेथील ओके बटनावर क्लिक करावेत. तद्नंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक (Employer) व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल. त्यावरच आपल्याला उजव्या बाजूला अप्लॉय बटनवर क्लिक केल्यास आपल्या पात्रतेनुसार स्वीकार होईल. शेवटी सक्सेसफूली ॲप्लायड फॉर  द जॉब असा मेसेज दिसेल. अशा पध्दतीने आपणास ऑनलाईन सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , हिंगोली या कार्यालयाचा भ्रमणध्वनी क्रमांक 9881150352 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त , कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

******

No comments: