04 July, 2024
मूल्यमापनाची कामे करण्यास इच्छूक त्रयस्थ संस्थेकडून 11 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित
हिंगोली (जिमाका), दि. 04 : जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गतची कामे पूर्ण झाल्यानंतर त्रयस्थ संस्थेमार्फत करावयाच्या मूल्यमापनासाठी इच्छूक पात्र संस्थेकडून 11 जुलै, 2024 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत .
त्या अनुषंगाने शासन निर्णयात नमूद केल्यानुसार मूल्यमापनाची कामे करण्यास इच्छूक त्रयस्थ संस्थेकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छूक त्रयस्थ संस्थांनी त्यांच्याकडील सविस्तर प्रस्ताव अटी व शर्तीसह कार्यालयातील नोटीस बोर्डावर नमूद असलेल्या कागदपत्रासह दि. 11 जुलै, 2024 पर्यंत जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, रेल्वे स्टेशन रोड, जुने एसपी ऑफिस जवळ, हिंगोली या कार्यालयाकडे इच्छूक त्रयस्थ संस्थांनी आपल्या संस्थेची नावे नोंदविण्यात यावीत, असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, हिंगोली यांनी केले आहे.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment