02 July, 2024
जिल्हास्तरीय अतिसार प्रतिबंध मोहीम सुरू
हिंगोली, दि.२ (जिमाका): स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अतिसार प्रतिबंध मोहिमेस प्रारंभ झाला.
दिनांक 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आला. यात प्रामुख्याने शाळा अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक कार्यालय इत्यादी ठिकाणी पिण्याचे पाणी व स्वच्छतेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच शुद्ध पाणी निर्जंतुकीकरणाचा वापर करून जनजागृती आजारास रोखणे, पाणी तपासणी अधिक गुणवत्ता पूर्ण करून दूषित पाणी स्त्रोतावर नियोजित वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व सरकारी कार्यालयातील क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे एफ. टी.के (ftk)पाणी गुणवत्ता तपासणी करणे तसेच ग्रामपंचायतीमधील इतर सर्व संस्थांमध्ये पाणी तपासण्याचे प्रात्यक्षिक देऊन तेथील विद्यार्थ्यांना व नागरिकांना पाणी तपासणीच्या स्वच्छतेचा संबंधित माहिती देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच जल स्त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. पाण्याचे व्यवस्थापन, स्वच्छता जागरूकता कार्यक्रम, तसेच गावातील नळ जोडणी, पाणी गळती जागा शोधून त्याची दुरुस्तीबाबत पाहणी करणे, छतावरील पाणी संकलन, कचऱ्याचे वर्गीकरण, शौचालयाच्या वापरासाठी विशेष उपक्रम, स्वच्छता जागरूकता कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. ही मोहीम यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले आहे. मोहिमेचा अहवाल सादर करणे, याप्रसंगी शिक्षण विभाग आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभाग, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रकल्प संचालक संजय कुलकर्णी यांनी अतिसार प्रतिबंध मोहिमेत करावयाच्या उपक्रमाची माहिती दिली. अतिसार प्रतिबंध मोहिमेचे जिल्हास्तरीय सनियंत्रण महेश थोरकर करणार आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment