26 July, 2024

जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन 1098 यांच्याकडून जनजागृती कार्यक्रम

हिंगोली, (जिमाका) दि. 26 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या नियोजनानुसार चाईल्ड हेल्पलाईन कक्षाचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांच्याकडून येथील सरस्वती विद्यामंदिरमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चाईल्ड हेल्पलाईन 1098 काय आहे व कशा प्रकारे आपातकालीन परिस्थितीत बालकांना मदत करण्याचे काम करते याविषयी माहिती देण्यात आली. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, चांगला स्पर्श व वाईट स्पर्श व बालकांचे हक्क तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेयाविषयी माहिती देण्यात आली. यावेळी चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, क्षेत्र कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत, सुपरवायझर विकास लोणकर, केस वर्कर तथागत इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा सूर्यवाड, शिक्षिका वंदना सोवितकर, स्मिता राजूलवार, अरुण इंगोले तसेच दामिनी पथकाच्या आरती वाकळे व शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. *******

No comments: