28 July, 2024
हिंगोली येथील लोकन्यायालयामध्ये 12 कोटी 53 लाख 78 हजार 579 रुपयांची 535 प्रकरणे निकाली
हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयामध्ये दि.27 जुलै, 2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 2395 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची वाद दाखलपूर्व 5763 प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित 223 व वाद दाखलपूर्व 312 असे एकूण 535 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयात तडजोडी आधारे प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात तब्बल 12 कोटी 53 लाख 78 हजार 579 रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आले.
या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विधीज्ञ समाविष्ट असलेली पाच पॅनल तयार करण्यात आले होते.
या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायाधीश-1 तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. व्ही. लोखंडे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा न्यायाधीश-1 आर. व्ही. लोखंडे, जिल्हा न्यायाधीश-3 श्रीमती एस. एन. गाडेकर-माने, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जी. के. नंदनवार, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी. यु. राजपूत, श्रीमती पी. आर. पमनानी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले. ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी. जी. देशमुख, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती व्ही. व्ही. सावरकर, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आय. जे. ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या लोकअदालतीला वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवशंकर साबळे, सचिव ॲड. अजय वानखेडे, वकील संघाचे सर्व सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment