31 July, 2024
पिंपळदरी येथील निवासी आश्रम शाळेच्या 400 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
हिंगोली (जिमाका), दि. 31 : मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. सुनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथील शासकीय निवासी आश्रम शाळेतील 400 विद्यार्थ्यांची नुकतीच आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी शासकीय निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाविषयी माहिती देत, मुलांची सिकलसेलची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोग, जलजन्य आजार, अतिसार, काविळ, टायफाईड व कीटकजन्य आजार, डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया, मेंदूज्वर याविषयी माहिती देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. आठवड्यातून एक दिवस वापरण्यात येणारे सर्व पाणीसाठे कोरडे करून स्वच्छ करावेत आणि कोरडा दिवस पाळण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच कुष्ठरोगाविषयी निबंध स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी तालुका आरोग्य अधिकार डॉ. अनुराधा गोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जमरे सर्व सीएचओ, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा वर्कर्स उपस्थित होते. कुष्ठरुग्णांची तपासणी एम.जी.पवार, पथोड डॉ.सोळंके, गायकवाड यांनी केली. शाळेचे मुख्याध्यापक आचार यांनी आरोग्य तपासणीसाठी मोलाचे सहकार्य केले.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment