24 July, 2024
शासनाने घोषित केलेल्या महत्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
हिंगोली (जिमाका), दि. 24 : महाराष्ट्र शासनाने मागील काही काहात अनेक महत्वपूर्ण योजना घोषित केल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घेण्यासाठी तसेच विभागातील सर्व जिल्ह्याची आकडेवारी संकलीत करण्यासाठी योजनाचे कार्यान्वयीन जिल्ह्यातील विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यासोबत समन्वय ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोडल अधिकारी म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर यांची, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांची, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांची, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेसाठी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण यांची तर मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना व मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वरील सर्व योजनासाठी सहायक नोडल अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी हे कामकाज पाहणार आहेत.
वरील सर्व नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी मा. मुख्यमंत्री व मा. मुख्य सचिव यांच्या सूचना व निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांना दिले आहेत.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment