11 July, 2024

अधिकचे शुल्क आकारल्यामुळे आपले सरकार सेवा केंद्र बंद जिल्हा प्रशासनाची कार्यवाही • निर्धारित सेवाशुल्क व्यतिरिक्त जादा शुल्क आकारल्यास लेखी तक्रार तहसीलदारांकडे नोंदवावी-जिल्हाधिकारी

हिंगोली (जिमाका), दि. 11 : प्रधानमंत्री पीक विमा योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व इतर योजनेस अर्ज करताना नागरिकांना विविध प्रमाणपत्राची आवश्यकता भासत असते. हे प्रमाणपत्र, दाखले व सेवा करिता नागरिक आपले सरकार केंद्रावर जाऊन अर्ज करतात. हिंगोली तालुक्यातील मौजे खंडाळा येथील आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांनी प्रधानमंत्री पिक विम्यासाठी निर्धारित सेवाशुल्क व्यतिरिक्त अतिरिक्त पैसे आकारल्यामुळे आपले सरकार सेवा केंद्र (CSC) बंद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व आपले सरकार केंद्र (CSC) चालकांनी निर्धारित सेवाशुल्क व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क आकारू नयेत. निर्धारित सेवाशुल्क व्यतिरिक्त नागरिकाकडून आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी इतर कोणतेही शुल्क आकारल्यास नागरिकांनी संबंधित तहसीलदाराकडे लेखी स्वरुपात तक्रार नोंदवावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. *******

No comments: