31 July, 2024
महसूल पंधरवाडा कालावधीत नोंदणी व मुद्रांक विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 31 : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने दि. 1 ऑगस्ट महसूल दिनापासून महसूल पंधरवाड्याला सुरुवात होणार आहे.
या महसूल पंधरवाड्यात शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दि. 1 ऑगस्ट महसूल दिनापासून ते दि. 15 ऑगस्ट, 2024 या महसूल पंधरवाडा कालावधीत नोंदणी व मुद्रांक विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या अभय योजना, सलोखा योजना, महिला खरेदीदाराला निवासी घटकांच्या खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्के सूट, ई-रजिस्ट्रेशन, विवाह नोंदणी आदी विविध योजना व सेवांचा लाभ देण्यात येणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment