25 July, 2024

मिशन शक्ती योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरण कार्यक्रम संपन्न

हिंगोली, (जिमाका)दि.२५: महिला व बालकल्याण हिंगोली व सखी वन स्टॉप सेंटर यांच्या वतीने केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे समर्थ महाविद्यालयात आज आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ महाविद्यालयाचे अध्यक्ष दिलीप घुगे होते. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सखी वन स्टॉप सेंटरचे समुदेशक दिनेश पाटील होते. तसेच केंद्र प्रशासक श्रीमती शिला रणवीर, कांचन भिसे आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाची रूपरेषा श्रीमती रणविर यांनी स्पष्ट केली. दिनेश पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सखी वन स्टॉप सेंटर महिला संबंधित राबविण्यात येणा-या योजनांबाबत माहिती देताना सांगितले की, महिलांना काहीही समस्या असतील तर त्यांनी 181 या मदत क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. अन्यायग्रस्त महिलांना शक्ती सदन या योजने अंतर्गत त्यांच्या समस्याचे निराकरण करण्यात येते. नोकरदार महिलांनी सखी निवास या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन विभागामार्फत करण्यात आले. अध्यक्ष श्री. घुगे यांनी विद्यार्थिनिंना मार्गदर्शन करताना सांगितले की, शासनाच्या या सर्व योजनांचा मुलींनी फायदा घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे आयोजन समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कोल्हे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अस्मिता आठवले यांनी केले. तर कार्यक्रमाचा समारोप प्रा. सुरेश कोल्हे यांनी केला. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्रीमती अस्मिता आठवले, भगवान बाबा नर्सिग स्कूल प्रा.लखन बगाटे, श्रीमती मंजू गर्जे, विलास सरकटे, श्रीमती पडघन, श्रीमती नरवाडे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महाविद्यालयातील विद्यार्थिनींची उपस्थिती होती. *****

No comments: