30 July, 2024

औंढा नागनाथ तालुक्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण

हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने औंढा नागनाथ तालुक्यातील अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील युवक, युवती व महिलांसाठी ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उमेदवार हा किमान आठवी पास असावा, वय 18 ते 45 असावे. यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, जातीचे प्रमाणपत्र, टीसी, बँक पासबूक जमा करुन दि. 8 ऑगस्ट, 2024 पर्यंत आपली नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी सिध्दार्थ थोरात (9552183038) कार्यक्रम आयोजक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. के. कादरी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे. ******

No comments: