26 July, 2024

कारगील विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन, तरुण युवकांनी सैन्यात भरती होऊन भारत मातेच्या सेवेसाठी योगदान द्यावे - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

• माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर हिंगोली, (जिमाका) दि. 26 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कारगील विजय दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन केले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, कारगील युध्दात ज्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी कारगील दिवसा साजरा करण्यात येत असल्याचे सांगून माजी सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचे सांगितले. तसेच तरुण युवकांनी सैन्यात भरती होऊन भारतमातेच्या सेवेसाठी योगदान द्देऊन आपले व आपल्या देशाचे उद्देश सफल करावेत, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, सुभेदार दत्तराव लेकुळे, कॅप्टन केशव मुकुंदराव जाधव युध्दात वीर मरण आलेल्या सैनिकांच्या पत्नी, वीरमाता श्रीमती यमुनाबाई तुकाराम शिंदे, श्रीमती लक्ष्मीबाई भिकाजी रणवीर, श्रीमती सिमाबाई शरदचंद्र दरणे, श्रीमती कलावतीबाई मोतीराम दिपके, श्रीमती शहजादीबी मोहमद रोशन यांचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सैनिक केशव भडंगे, कडोजी टापरे, नामदेव मस्के, आनंदा जायभाये, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सुरेश भालेराव, कल्याण संघटक कॅप्टन तुकाराम मुखाडे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी मौन पाळून शहिदांना श्रध्दांजली वाहिली. तसेच शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. *****

No comments: