10 July, 2024
लोकसंख्येचा स्फोट थांबवूया - मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार
* लोकसंख्येचा वाढता आलेख थांबवण्यासाठी प्रभावी माध्यमांचा होतोय उपयोग
हिंगोली (जिमाका), दि. 10 : यावर्षीचे जागतिक लोकसंख्या दिनाचे शीर्षक-"माता आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी दोन अपत्यात योग्य अंतर ठेवा" हे असून घोषवाक्य-"ओळख नव्या विकसित भारताची, कुटुंबनियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची" ही आहे.
उद्या गुरुवारी जागतिक लोकसंख्या दिन असून, या दिनानिमित्त लोकसंख्येचा वाढता आलेख थांबण्यासाठी विविध प्रभावी माध्यमांचा उपयोग करण्यात येतो. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील जनजागृती कार्यक्रम महत्त्वाचे ठरत आहेत. "हम दो, हमारे दो" याप्रमाणे प्रत्येक कुटुंब नियोजन संकल्पना बनवण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध मार्गाने जनजागृती करण्यात येत आहे. आरोग्य संस्थेत कुटुंबनियोजन स्त्री व पुरुष शस्त्रक्रिया शिबिर घेतले जातात. याचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी केले आहे.
जागतिक लोकसंख्या दिनाचे जनतेच्या माध्यमातून माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. कुटुंबात गर्भधारणा आवश्यक कुटुंब नियोजन महत्त्वाचे होते. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आशामार्फत कुटुंब नियोजन साधनांचा पुरवठा करुन लहान कुटुंबासाठी मत परिवर्तन केले जाते.
लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार, लग्नाच्या वेळीचे वय लांबविणे, मुलीसाठी 18 व मुलाचे वय 21 वर्षानंतर विवाह करणे. दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्यास ओसी पील्स गोळी, निरोध, तांबी, अंतरा इंजेक्शनचा वापर बाळास स्तनपान करणाऱ्या महिलांनी करणे. आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडीमार्फत लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment