23 July, 2024

अतिसार प्रतिबंधक मोहीम जिल्हास्तरीय जनजागृती कार्यशाळा

हिंगोली (जिमाका), दि. 23 : येथील जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात दि. 22 जुलै, 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिसार प्रतिबंध जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, भूजल सर्वेक्षणचे रवींद्र मांजरेकर, प्रकाश जाधव, अरुण पवार प्रामुख्याने उपस्थित होते. संचालक संजय कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले आहे. त्यात 90 टक्के साथरोग हे दूषित पाण्यामुळे होतात. या मोहिमेत आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद यांचा समन्वयाने केले आहे. तसेच स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा, सुखा कचरा निळा हे अभियान राबवले जात आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी गावातील सर्व समुदायाच्या सहकार्याने गावातच पाणी नमुने तपासणी जलसुरक्षकाद्वारे गावातील प्रत्येक जल स्त्रोत तपासणी व परिसर स्वच्छता शाळा, अंगणवाडी, येथील परिसर स्वच्छता, आरोग्य विभाग मार्फत ओ आर एस पावडर, झिंक गोळी वाटप तसेच ग्राम पातळीवर वैयक्तिक स्वच्छता बाळगून अतिसार प्रतिबंध यशस्वी करण्याचे आवाहन केले . जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता सर्वेक्षण व माहे एप्रिल ते ऑक्टोबर मधील पुनर्वापर करण्यात आला. लोकसहभागाने पूर्ण करून जोखीमग्रस्त गावात वेळीच उपाय योजना करणे बाबत माहिती दिली. तसेच स्वच्छता सर्वेक्षण हे सरपंच, आरोग्य सेवक, सरपंच पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य समिती, जलसुरक्षक, आशा वर्कर यांनी सहकार्याने काळजीपूर्वक पूर्ण करावे असे नमूद केले. तसेच गावातील पाणी शुद्धी करणे. ब्लिचिंग पावडरचा उपयोग करणे, नळाची दुरुस्ती नियमित करणे गरजेचे आहे. नळ देण्यात आला. पाणी शुद्ध शुद्धीकरण यत्राचे पाणी शुद्ध करण्यासाठी सूचित केले आहे, असे मत प्रतिपादन केले. प्रत्येक जलसूरक्षक व प्रचारक तपासणी करणे आवश्यक असल्याबाबत मत मांडले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सतीश रुग्णवाल यांनी शाळा, अंगणवाडी, या ठिकाणी स्वच्छतेचे राखणे ही मोहीम, पाणी उकळून देणे, परिसर स्वच्छता राखणे, तसेच पिण्याचे पाण्याच्या टाक्या स्वच्छ धुणे, तसेच शाळा अंगणवाडी येथील स्वच्छतेबाबत माहिती दिली. तसेच लहान बालकांना अतिसाराचा धोका जास्त असतो. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात व ओआरएस पाकीट झिंक गोळ्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच सदरच्या मोहिमेत आरोग्य विभाग शंभर टक्के काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली आहे. प्रत्येक गावात आरोग्य सेवक यांनी क्लोरीन बाबत चाचणी करणे गरजेचे असल्याने सांगितले आहे. तसेच शिक्षणाधिकारी यांनी अतिसार प्रतिबंध मोहीम सर्व शाळांमध्ये जनजागृती मोहीम प्रभात फेरी काढणे. शौचालय दुरुस्ती बाबत व शाळेतील पाणी नमुने तपासणी करणे. तसेच याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. महेश थोरकर यांनी अतिसार प्रतिबंध मोहिमेचे अंतर्गत दिनांक 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान पहिला आठवडा ते आठवा आठवडा यामधील प्रत्येक कार्यक्रमाची माहिती दिली . तसेच विष्णू मेहेत्रे यांनी ओडिफ प्लस गावात बाबत माहिती दिली. माहिती शिक्षण व संवाद तज्ञ शामसुंदर मस्के यांनी स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा सुखा निळा व गृहभेटीबाबत जनजागृती केली. राठोड व सरकटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सर्व तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आरोग्य विस्तार अधिकारी , गट समन्वयक, समूह समन्वयक अंगणवाडी , पर्यवेक्षक, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य विभाग व पंचायत समितीतील कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्हा व पाणी स्वच्छता मिशन कक्षातील सर्व तज्ज्ञ सल्लागार मंडळ उपस्थित होते. *******

No comments: