08 July, 2024
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
हिंगोली (जिमाका), दि. 08 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टिने जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून दि. 15 जुलै, 2024 रोजी कै. शिवाजीराव देशमुख सभागृह, रामलीला मैदानाजवळ, हिंगोली येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात पिपल्स ट्री ऑनलाईन प्रा.लि. अमरावती, फ्यूजन मायक्रो फायनांन्स प्रा.लि.हिंगोली, धूत इलेक्ट्रीकल सिस्टीम प्रा.लि.छत्रपती संभाजीनगर, आकार ऑटो इंडस्ट्रीज लि. छत्रपती संभाजीनगर, मनसा मोटर्स (महिंद्रा), (टाटा मोटर्स) हिंगोली, टापरे इलेक्ट्रीक्ल्स हिंगोली, फोर्ब्स ॲन्ड कंपनी वाळूज एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर, सिआई ॲल्युमिनियम कास्टींग इंडिया लिमिटेड छत्रपती संभाजीनगर, टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम लि.पुणे, क्रिडेट एक्सेस ग्रामीण लि.हिंगोली, नवकिसान बायोप्लॉनटेक लि.नांदेड, समर्थ ट्रॅक्टर्स हिंगोली, स्पंदना मायक्रो फायनांन्स हिंगोली, उत्कर्ष स्मॉल फायनांस बँक वाशिम, नवभारत फर्टीलायझर लि. छत्रपती संभाजीनगर, भारत फायनांन्स लि. हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, एसबीआय लाईफ इन्श्युरन्स हिंगोली अशा महाराष्ट्रातील नामांकित कंपनी व हिंगोली जिल्ह्यातील शासनाचे विविध महामंडळ रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार एक हजारपेक्षा अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswyam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करुन स्वत: मूळ कागदपत्रासह कै. शिवाजीराव देशमुख सभागृह, रामलीला मैदानाजवळ, हिंगोली येथे दि. 15 जुलै, 2024 रोजी सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनीवर किंवा 7972888970, 7385924589 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment