23 July, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. ******

No comments: