05 July, 2024
सामाजिक न्याय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचे मनोगत व वृक्षारोपण
हिंगोली (जिमाका), दि. 05 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दि. 1 जुलै, 2024 रोजी हरित क्रांतीचे प्रणेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री व कृषी मंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या 111 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामध्ये सामाजिक न्याय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचे मनोगत व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबसाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारार्थी तथा सेवा निवृत्त प्राचार्य विक्रम जावळे हे होते.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारार्थी बबन मोरे, डॉ. वर्षा कुरील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी आनंदराव शिखरे, डॉ. रवि थोरात, देविदास खरात, बाबूराव गाडे, रमेश खिल्लारी व आदर्श महाविद्यालयाचे प्रा. आर. डी. पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय तथा मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह व नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या फळांच्या रोपांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन समतादूत सुरेश पठाडे यांनी केले. तर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक शकुंतला घुगे यांनी केले.
यावेळी आत्माराम वागतकर, श्रीकांत कोरडे, विजयकुमार सोनटक्के, सुनिल वडकुते, बालाजी टेंभुर्णे, मनीष राजूलवार, सखाराम चव्हाण, नागनाथ नकाते, राजू ससाणे, सिध्दार्थ गोविंदे, अशोक इंगोले, नितीन राठोड, बाळू पवार, संदीप घनतोडे, शंकर पोघे, सुलोचना ढोणे, श्रध्दा तडकसे, मिनाक्षी बांगर, ज्याती बिजले आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment