29 July, 2024
गुरुवारपासून ई-पीक पेरा नोंदणी प्रक्रियेस सुरुवात • शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्ह्यातील पात्र शेतक-यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळण्यासाठी पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी गुरुवार, ( दि. 1 ) पासून पीक पेऱ्यांची अचूक नोंदणी आपल्या मोबाईल अॅपमध्ये करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
सर्व शेतकऱ्यांनी शेतातील ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून सातबारावर पेरा केलेल्या विविध पिकाची नोंदणी करावी. आता ही नोंदणी आपल्या मोबाईल ॲपमधून करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा हा पीक पाहणी प्रकल्प 1 ऑगस्ट 2024 पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2024 करिता दिनांक 01 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पीक पेऱ्याची अचूक नोंद करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment